Sunday, February 19, 2023
अजित देवळे यांनी कोणकोणते चित्रपट दिग्दर्शित केले आहेत?
मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक अजित देवळे यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात २०१२ पासूनच केली आहे. त्यांनी एकूण १२ मालिका केल्या आहेत. त्यातील स्वप्नांच्या पलिकडले, घाडगे ऍन्ड सून या सुपरहिट ठरल्या. २०१४ मध्ये 'आशियाना' हा त्यांचा पहिला चित्रपट आला. 'डा. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली. एडिटर म्हणून सात मराठी चित्रपट केले आहेत, त्यात 'हृदयांतर' हा शेवटचा चित्रपट आहे. आता त्यांनी दिग्दर्शित केलेला 'मसुटा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मसुटा म्हणजे मराठीमध्ये 'स्मशानभूमी'. गावाकडच्या ठिकाणी, सोलापूर या भागात स्मशानाला मसुटा असे म्हणतात. आपल्याकडे जसे 'स्मशानात जाऊन मर' म्हणतात, तसेच तिकडे “मसुट्यात जाऊन मर' बोलतात. स्मशानभूमीसाठी पर्यायी शब्द त्यांनी शोधून काढला. शब्दातच आम्हाला गंमत वाटली, म्हणून चित्रपटाला मसुटा' नाव देण्यात आले आहे. लोकप्रिय लेखक आणि दिग्दर्शक अजित देवळे यांचा 'मसुटा' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मनेष लोढा आणि भरत मोरे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मसणजोगी कुटुंबाची व्यथा मांडण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास
बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...

-
वहिदा रहमान या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली. नंतर गुरू दत्त यांनी त्...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
सारांश: दीपिका पादुकोण आपल्या वडिलांची, ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची बायोपिक निर्मिती करणार आहे. सध्या ती 'कल्की २८९८...
No comments:
Post a Comment