Saturday, March 25, 2023
कालचा किशन कन्हैया अक्षय कुमार, आजचा 'मिस्टर क्लीन
'सौगंध’ (1991) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा 'खिलाडी कुमार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. खऱ्या अर्थाने अक्षय कुमारची ओळख 'खिलाडियों का खिलाडी' (1996) या चित्रपटाद्वारे झाली. अक्षय कुमार त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिला. आयेशा जुल्का, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रा आणि रेखा यांसारख्या किती तरी बॉलीवूड सौंदर्यवतींचे नाव त्याच्याशी जोडले गेले. अक्षय कुमारचे प्रियंका चोप्रासोबतचे अफेअर सर्वाधिक चर्चेत होते. 'अंदाज' (2003) मध्ये काम करताना तो देसी गर्ल प्रियांकावर क्रश झाला होता. असेच काहीसे अक्षयच्या बाबतीत प्रियांकाच्या बाबतीत घडले. त्यानंतर 'ऐतराज' (2004) मध्ये एकत्र काम करताना अक्षय कुमार आणि प्रियांकाला पुन्हा एकदा जवळ येण्याची संधी मिळाली. 'ऐतराज' (2004) दरम्यान दोघांमधील जवळीक सतत वाढत गेली. या चित्रपटातील त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट सुपरहिट ठरला. अक्षय जेव्हा प्रियांकाच्या आधी रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि रेखा यांच्या प्रेमात पडला होता, तेव्हा त्याचे लग्न झाले नव्हते. पण प्रियंकासोबतचे प्रेम बहरत असताना त्याची पत्नी ट्विंकल ही अक्षयच्या मार्गात सर्वात मोठी अडचण ठरत होती. प्रियंकासोबत अक्षयच्या अफेअरची बातमी ट्विंकलच्या कानापर्यंत पोहोचली तेव्हा तिने अक्षयला अल्टिमेटम दिला की, त्याने प्रियंकासोबत पुन्हा कुठलाही चित्रपट करायचा नाही. झालं ही काहीसं असंच! 'ऐतराज' (2004) च्या यशानंतर ही जोडी फक्त 'वक्त: रेस अगेन्स्ट टाइम' (2005) या एकाच चित्रपटात एकत्र दिसली होती आणि हा चित्रपट या जोडीचा शेवटचा चित्रपट ठरला. अक्षयची आयशा झुल्का, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि प्रियांका यांच्याशी असलेली जवळीक समजण्यासारखी आहे. मात्र 'खिलाडियों का खिलाडी' (1996) मध्ये काम करताना जडला होता 13 वर्षांनी मोठी असलेल्या रेखाचा जीव अक्षय कुमारवर , तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 'खिलाडियों का खिलाडी'मध्ये अक्षयसोबत रेखाचा उत्कट रोमँटिक सीन चित्रित करताना रेखा आणि अक्षय कुमार जवळ आल्याचे सांगितले जाते. त्या काळात अक्षय कुमार चित्रपटात काम करणारी मुख्य अभिनेत्री रवीनाला डेट करत होता. त्यांच्यात अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या, पण रेखा ज्याप्रकारे सेटवर अक्षय कुमारसोबत मोकळेपणाने वेळ घालवत होती, आणि त्याच्यासाठी घरून जेवण बनवून आणायची, तेव्हा रवीनाची परिस्थिती मोठी असह्य होत होती! रेखा आणि अक्षय यांच्यातील जवळीकीमुळे अक्षय कुमार आणि रवीना टंडन अखेर विभक्त झाले. एक मात्र खरे की, ट्विंकलसोबतच्या लग्नाआधी अक्षयची प्रतिमा 'किशन कन्हैया'ची होती, पण लग्नानंतर तो इतका सुधारला आहे की त्याला 'मिस्टर क्लीन' म्हटले जाऊ लागले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
Subscribe to:
Post Comments (Atom)
यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास
बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...

-
वहिदा रहमान या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली. नंतर गुरू दत्त यांनी त्...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
सारांश: दीपिका पादुकोण आपल्या वडिलांची, ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची बायोपिक निर्मिती करणार आहे. सध्या ती 'कल्की २८९८...
No comments:
Post a Comment