Sunday, April 2, 2023

अविवाहित तब्बू


 सध्या सगळीकडेच अजय देवगण व तब्बूची मुख्य भूमिका असलेल्या भोला चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील अजयसह तब्बूच्या भूमिकेचेही विशेष कौतुक होताना दिसत आहे. तब्बूने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तब्बू तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. ५२ वर्षीय तब्बू अजूनही अविवाहितच आहे. पण तिचं नाव कलाक्षेत्रातील काही मंडळींशी जोडले गेले. प्रेम या चित्रपटामध्ये तब्बूसह संजय कपूरही मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तब्बू व संजय यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. एका मुलाखतीत संजय कपूरने म्हटले होते की, मी सुरुवातीला तब्बूला डेट करत होतो. पण चित्रपटाचे चित्रीकरण संपत आले तसा आमच्यामधील संवादही कमी होत गेला.

दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाबरोबरही तब्बूचे नाव जोडले गेले. जीत चित्रपटाच्यादरम्यान साजिद आणि तब्बू एकमेकांच्या प्रेमात पडले. पण साजिद त्यावेळी त्याची दिवंगत पत्नी दिव्या भारतीला विसरु शकत नव्हता. दरम्यान, तब्बूला ही गोष्ट समजताच दोघांच्या नात्यामध्ये दरी निर्माण झाली. साजिदनंतर तब्बू दाक्षिंणात्य अभिनेता नागार्जुन अक्किनेनीच्या प्रेमात पडली. नागार्जुन विवाहित असताना तब्बू त्याला डेट करत होती. जवळपास १0 वर्षे तब्बू व नागार्जुनचे अफेअर होते. पण नागार्जुन त्याच्या पत्नीला कधीच सोडणार नाही हे तब्बूच्या लक्षात आले. तब्बूच्या या नात्याचाही शेवट झाला. तब्बू अजूनही अविवाहित आहे. 

ती लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांची भाची आहे, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. हैदराबाद मध्ये जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाशमी असे आहे. 

1 comment:

  1. 53 वर्षांच्या तब्बूचा अभिनय अजूनही दमदार; 'वीरे दी वेडिंग 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने निर्मित केलेल्या 'वीरे दी वेडिंग' (2018) या चित्रपटाद्वारे मुलगा तैमूरला जन्म दिल्यानंतर करीना कपूरने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. तेव्हापासून प्रेक्षक 'वीरे दी वेडिंग'च्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. नुकताच त्याचा सिक्वेलही जाहीर झाला. या सिक्वलमध्ये करीना कपूरने तिची उपस्थिती पक्की केली आहे. रिपोर्ट्सनुसार, करीना कपूरसोबत तब्बूही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'वीरे दी वेडिंग 2' हा चित्रपट यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये फ्लोअरवर जाणार होता पण त्याला अजून वेळ लागू शकतो. तब्बू ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने गेल्या काही वर्षांत 'चांदनी बार' (2001), 'मकबूल' (2003), 'चीनी कम' (2007), 'हैदर' (2014), 'दृश्यम' (2015), 'अंधाधुन' (2018), 'दृश्यम 2' (2022), 'भूल भुलैया 2' (2022) आणि 'भोला' (2023) यांसारख्या काही चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.
    आजकाल ५३ वर्षांची तब्बू जवळपास प्रत्येक चित्रपटात अप्रतिम काम करत आहे. तिला प्रत्येक चित्रपटात पाहून असे वाटते की तिने अजून आपलं बेस्ट राखून ठेवलं आहे. परंतु पुढं पुढं जसजशी काम करत आहे,तसतसं तिच्या कामात उठावदारपणा येत आहे. तब्बूच्या अभिनयात नाट्यमयता कमी आणि वास्तवता जास्त दिसून येत आहे आणि ही तब्बूच्या अभिनयाची खासियत आहे.ती फक्त अभिनयच करत नाही तर प्रत्येक सीनमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देते. 4 नोव्हेंबर 1970 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेली तब्बू 90 च्या दशकापासून हिंदी चित्रपटसृष्टीत सतत सक्रिय आहे आणि तिची लोकप्रियता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.नेटफ्लिक्सवर 5 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला तब्बूचा आणखी एक 'खुफिया' या चित्रपटानेही धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात तब्बूने एका गुप्तहेराची अतिशय उत्तम भूमिका साकारली आहे. 'खुफिया' हा तब्बूचा विशाल भारद्वाजसोबतचा तिसरा चित्रपट आहे.याआधी दोघांनी गँगस्टर ड्रामा 'मकबूल' (2003) आणि क्राइम ड्रामा 'हैदर' (2014) मध्ये एकत्र काम केले आहे. विल्यम शेक्सपियरच्या मॅकबेथ आणि हॅम्लेट या कथांवर आधारित 'हैदर' (2014) या चित्रपटात तब्बूने साकारलेली शाहिद कपूरच्या आईची भूमिका अप्रतिम होती. तब्बू स्वतःला भाग्यवान समजते, ती अनेकदा म्हणते की तिच्या चित्रपट निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी तिला कधीही स्टिरियोटाइप करण्याचा प्रयत्न केला नाही आणि तिला नेहमीच सर्व प्रकारच्या पात्रांमध्ये क्षण सापडले आणि तिने प्रत्येक पात्राला पडद्यावर खूप चांगल्या प्रकारे उतरवण्याचा प्रयत्न केला.


    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...