Saturday, March 25, 2023

कालचा किशन कन्हैया अक्षय कुमार, आजचा 'मिस्टर क्लीन


'सौगंध’ (1991) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा 'खिलाडी कुमार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. खऱ्या अर्थाने अक्षय कुमारची ओळख 'खिलाडियों का खिलाडी' (1996) या चित्रपटाद्वारे  झाली. अक्षय कुमार त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिला. आयेशा जुल्का, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रा आणि रेखा यांसारख्या किती तरी बॉलीवूड सौंदर्यवतींचे नाव त्याच्याशी जोडले गेले. अक्षय कुमारचे प्रियंका चोप्रासोबतचे अफेअर सर्वाधिक चर्चेत होते. 'अंदाज' (2003) मध्ये काम करताना तो देसी गर्ल प्रियांकावर क्रश झाला होता. असेच काहीसे अक्षयच्या बाबतीत प्रियांकाच्या बाबतीत घडले. त्यानंतर 'ऐतराज' (2004) मध्ये एकत्र काम करताना अक्षय कुमार आणि प्रियांकाला पुन्हा एकदा जवळ येण्याची संधी मिळाली. 'ऐतराज' (2004) दरम्यान दोघांमधील जवळीक सतत वाढत गेली. या चित्रपटातील त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट सुपरहिट ठरला. अक्षय जेव्हा प्रियांकाच्या आधी रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि रेखा यांच्या प्रेमात पडला होता, तेव्हा त्याचे लग्न झाले नव्हते. पण प्रियंकासोबतचे प्रेम बहरत असताना त्याची पत्नी ट्विंकल ही अक्षयच्या मार्गात सर्वात मोठी अडचण ठरत होती. प्रियंकासोबत अक्षयच्या अफेअरची बातमी ट्विंकलच्या कानापर्यंत पोहोचली तेव्हा तिने अक्षयला अल्टिमेटम दिला की, त्याने प्रियंकासोबत पुन्हा कुठलाही चित्रपट करायचा नाही. झालं ही काहीसं असंच! 'ऐतराज' (2004) च्या यशानंतर ही जोडी फक्त 'वक्त: रेस अगेन्स्ट टाइम' (2005)  या एकाच चित्रपटात एकत्र दिसली होती आणि हा चित्रपट या जोडीचा शेवटचा चित्रपट ठरला. अक्षयची आयशा झुल्का, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि प्रियांका यांच्याशी असलेली जवळीक समजण्यासारखी आहे. मात्र 'खिलाडियों का खिलाडी' (1996) मध्ये काम करताना जडला होता 13 वर्षांनी मोठी असलेल्या रेखाचा जीव अक्षय कुमारवर , तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 'खिलाडियों का खिलाडी'मध्ये अक्षयसोबत रेखाचा उत्कट रोमँटिक सीन चित्रित करताना रेखा आणि अक्षय कुमार जवळ आल्याचे सांगितले जाते. त्या काळात अक्षय कुमार चित्रपटात काम करणारी मुख्य अभिनेत्री रवीनाला डेट करत होता. त्यांच्यात अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या, पण रेखा ज्याप्रकारे सेटवर अक्षय कुमारसोबत मोकळेपणाने वेळ घालवत होती, आणि त्याच्यासाठी घरून जेवण बनवून  आणायची, तेव्हा रवीनाची परिस्थिती मोठी असह्य होत होती! रेखा आणि अक्षय यांच्यातील जवळीकीमुळे अक्षय कुमार आणि रवीना टंडन अखेर विभक्त झाले. एक मात्र खरे की, ट्विंकलसोबतच्या लग्नाआधी अक्षयची प्रतिमा 'किशन कन्हैया'ची होती, पण लग्नानंतर तो इतका सुधारला आहे की त्याला 'मिस्टर क्लीन' म्हटले जाऊ लागले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

Sunday, March 19, 2023

अभिनेता शाहिद कपूरच्या कारकिर्दीची वीस वर्षे


शाहीद कपूरने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज त्याला बॉलिवूड मध्ये येऊन वीस वर्षे झाली. बॅकग्रआऊंड डान्सर म्हणूनही त्याने सुरुवातीच्या काळात काम केलं. २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या इश्क विश्क चित्रपटामधून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्याने विवाह, जब वी मेट, कमीने, उडता पंजाब, उडता पंजाब, कबीर सिंग सारख्या चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. 

शाहिद कपूरचा जन्म 25 फेब्रुवारी 1981 रोजी दिल्लीत झाला. वडिलांचे नाव पंकज कपूर आहेत, जे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता निर्माता आहेत.त्यांच्या आईचे नाव नीलिमा अझीम आहे. त्याला 3 भावंडे आहेत - सना कपूर, ईशान खट्टर आणि रुहान कपूर. ईशान खट्टरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहिद कपूर हा आज बॉलीवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे, परंतु त्याने यापूर्वी टीव्ही जाहिरातींमध्ये आणि बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केले आहे. 'इश्क विश्क' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या शाहिदने पहिल्याच चित्रपटातून  प्रेक्षकांची मने जिंकली. त्या काळात विशेषतः मुलींमध्ये रोमँटिक हिरोंची खूप क्रेझ दिसून येत होती. 

या चित्रपटासाठी शाहिदला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला होता.यानंतर 2006 मध्ये सूरज बडजात्याचा 'विवाह' हा चित्रपट खूप गाजला. त्याचवेळी 2007 मध्ये आलेला इम्तियाज अलीचा 'जब वी मेट' हा शाहिदच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील यादगार चित्रपटांमधला एक गणला जातो. 2009 मध्ये, शाहिदला विशाल भारद्वाजच्या 'कमिने' या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी समीक्षकांची प्रशंसा मिळाली. यादरम्यान त्यांनी दिल बोले हडिप्पा, चांस पे डान्स, पाठशाला, बदमाश कंपनी, मिलेंगे मिलेंगे, मौसम आणि तेरी मेरी कहानी या चित्रपटांमध्ये काम केले, परंतु यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही.  2013 साली शाहिदचे 'फटा पोस्टर निखला हिरो ' आणि 'आर राजकुमार'  हे चित्रपट प्रदर्शित झाले.   प्रभुदेवा दिग्दर्शित आर राजकुमारला तिकीट खिडकीवर सरासरी यश मिळाले. या चित्रपटात शाहिदने आपल्या जबरदस्त अॅक्शन सीन्सद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. 

शाहिदचा 'हैदर' हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. विशाल भारद्वाज दिग्दर्शित चित्रपटातील दमदार अभिनयासाठी शाहिद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. याशिवाय 'पद्मावत' आणि 'कबीर सिंग' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचेही कौतुक झाले होते. कबीर सिंग हा शाहिदचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. शाहिदची करीना कपूरसोबतची जोडीही छान जमली होती.  या दोघांच्या जोडीला पडद्यावर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. शाहिद आणि करिनाच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत राहिल्या. मात्र, करिनाने सैफ अली खानशी लग्न केले आणि शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले. विशेष म्हणजे मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या वयात 13 वर्षांचा फरक आहे, पण दोघांचे बाँडिंग पाहून तुम्हीही म्हणाल की, दोघांमधील वयाचे हे अंतर फक्त सांगायला आहे. मीरा आणि शाहिदचे 2015 साली लग्न झाले होते. दोघांनी अरेंज मॅरेज केले होते.  मीरा आणि शाहिदचे काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत गुरुग्राममध्ये एका खाजगी समारंभात लग्न झाले. दोघांना दोन लाडकी मुलं आहेत, ज्यांची नावे मीशा कपूर आणि झैन कपूर आहेत. अलीकडेच त्याने 'फर्जीं ' द्वारा वेबमालिकेद्वारा छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

मेहंदी व दो या नावावरून आतापर्यंत किती चित्रपट निर्माण झाले आहेत? त्यातील प्रमुख कलाकार कोण?


प्रश्न - मेहंदी व दो या नावावरून आतापर्यंत किती चित्रपट निर्माण झाले आहेत? त्यातील प्रमुख कलाकार कोण?

उत्तर-  मेहंदी या नावाचे तीन चित्रपट आतापर्यंत निर्माण झाले आहेत. १९४७ साली पहिला मेहन्दी निर्माण झाला होता. नरगिस, बेगमपारा (माशूक मधील अयूबखान या नायकाची आई) करणदीवाण, मुराद, घोरी, जिल्लोबाई, अन्वरी, जानी बाबू, बेबी श्यामा, प्रतिमादेवी.यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. १९५८ साली दुसरा मेहन्दी निर्माण झाला होता. व तो उमराव जानच्या जीवनावर आधारलेला होता. शांताराम बापूंची भूतपूर्व पत्नी व राजश्रीची आई जयश्री हिने या चित्रपटात उमराव जानची भूमिका केली होती. तिच्याबरोबर अजित, वीणा, ललिता पवार, बालम, मिर्झा, मुश्रफ, कुमार, मुमताज बेगम, कृष्णकांत यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. 1963 साली तिसरा 'मेहंदी' निर्माण झाला होता. विनोद मेहरा, रंजिता, मदनपुरी, उषा किरण, राज बब्बर यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. मेहंदी या शब्दांपासून सुरू झालेले इतर चित्रपट गुजराती भाषेत अधिक निर्माण झाले होते.

दो या शब्दापासून सुरू झालेले चित्रपट पुढीलप्रमाणे- दो आंखे (1974- कलाकार- अशोक कुमार, रेखा, विश्वजीत, देवमुखर्जी, नाज, मानकी दास, आय एस जौहर(, दो चट्टाने (1974 कलाकार- राकेश पांडे, विक्रम, आशा सचदेव, अरुणा इरानी, जोगेंद्र, ओमप्रकाश), दो नंबर के अमीर (1974 आशा सचदेव, 

सुजीतकुमार, रुपेशकुमार, जोहर) दो आदमी (१९६०, जयराज, शशिकला, जींवनकला, कुमुद त्रिपाठी) दो दोस्त (१९६०, चित्रा, कामरान, हेलन) दो अन्जाने (१९७४, अमिताभ, रेखा, प्रेम चोप्रा, प्रदीपकुमार, उत्पल दत्त, ललिता पवार, मिथुन चक्रवर्ती) दो खिलाडी (१९७६ विनोद मेहरा, जाहीदा, शशीपुरी, अनिता गुहा) दो लडकीयां (१९७६ संजीवकुमार, मालासिन्हा, मेहमूद, सुलोचना) दो आंखे बारह हाथ (१९५७ व्ही शांताराम, संध्या, बाबूराव पेंढारकर, उल्हास, केशवराव दाते, बी. एम. व्यास) दो रोटी (१९५७ बलराज साहनी, निरुपा रॉय, जॉनी वॉकर, मेहमूद, कन्हैयालाल) दो और दो पांच (१९८० अमिताभ, शशी कपूर, हेमा' मालिनी, परवीन बाबी) दो प्रेमी (१९८२ ऋषी कपूर, मौसमी चटर्जी, गीता बहल, जोहर) दो शत्रू (१९८० शत्रुघ्न सिन्हा, शर्मिला ठागोर, सुजीतकुमार) दो बच्चे दस हाथ (१९७२ सुभाष घई, अनुपमा, प्रेमनाथ, रमेश देव) दो चोर (१९५१ धर्मेन्द्र, तनुजा, के. एन. सिंग, शोभना  समर्थ) दो गज जमिन के नीचे (1972 शत्रुघ्न  सिन्हा, विनोद खन्ना ) दो बहन  (1966 आशा पारेख, मनोजकुमार, सिप्पी, प्राण) दो दिलों की दास्तान (1966 प्रदीप कुमार, वैजयंती माला, शशिकला), दो मतवाले (१९६६ रंधवा, मलिका) : दो बदसाष (1932 घोरी, दिक्षिता,शांता). दो बहाद्वर (१९५३ बलराज साहनी, निरूपा रॉय) दों बाते ( 1949 रमोला नारंग), दो भाई ( 1947 कामिनी कौशल, राजन एक्सर, उल्हास), दो दिल (१९४७  शमिम, महिपाल, अनिता शर्मा) दो भाई ( 1968 अशोक कुमार शेख मुख्तार, जितेन्द्र, माला सिन्हा), दो रास्ते ( 1969 राजेश खन्ना, मुमताज,बलराज साहनी, बिंदू,वीणा, प्रेम चोप्रा), दो भाई (1961 शकीला,अभी भट्टाचार्य, अनिल कफूर) दो बुंद पानी (१९७९ सिम्मी, जलाल आगा, किरण कुमार) दो चेहरे (1977 अरुणा इराणी, वीरेंद्र, पद्मा खन्ना ), दो दिलवाले (1977 सोम दत्ता, सरिता सेन), दो शोले (1977 नरेंद्र गौरी वर्मा) , दो दिल (1965 राजश्री, विश्वजीत, मेहमूद), दो दिल दिवाने (1981 कमल हसन, रती अग्निहोत्री), दो दिलों की दास्तान (1985 संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे, अरुण गोविल), दो दिशांए (1982 धमेन्द्र, हेमा मालिनी, प्रेम चोप्रा), दो दिवाने (1936 मोतीलाल, शोभना समर्थ, याकूब), दो दुनी चार ( 1968 किशोर कुमार, तनुजा, अजित सेन), दो कलियां ( 1968 विश्वजीत, मालासिंहा, बेबी सोनिया), दो दुल्हे ( 1955 सज्जन, श्यामा), दो दुश्मन (1965 दारासिंग, अजित, मुमताज), दो घडी की मौज (1935 सुलोचना, रुबी मायर्स, डी बिलमोरिया), दो गुलाब ( 1983 कुणाल गोस्वामी, मीनाक्षी शेषाद्री), दो गुंडे (१९५९ राजकपूर, मधुबाला, शेख मुख्तार, सुलोचना) दो बहने (१९५९ राजेन्द्र कुमार, श्यामा) दो हवालदार (१९७९ असरानी, झरीना वहाब) दो शिकारी (१९७९ विश्वजीत, रेखा) दो जासूस (१९७५ राज कपूर, राजेंद्र कुमार, शैलेंद्र सिंह, भावना भट्ट) दो झुठे (१९७५ विनोद मेहरा, मौसमी चटर्जी) दो ठग (१९७५ हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा) दो कलियां (१९४९ राजन, शालिनी), दो लडके दोनो कडके (१९७९ अमोल पालेकर, मौसमी चटर्जी) दो मुसाफिर (१९७८ अशोककुमार, शशी कपूर, रेखा) दो मस्ताने (१९५८ मोतीलाल, शेख मुख्तार, बेगम पारा) दो फ़ूल (१९५८ मा. रोमी, बेबी नाज) दो फूल (१९७३ अशोककुमार, मेहमूद, अरुणा ईराणी, विनोद मेहरा) दो राहे' (१९५३ नलिनी जयवंत शेखर) दो राहे (१९७१ राधा सलूजा, अनिल धवन, रुपेश कुमार) दो सितारे (१९५१ देव आनंद, सुरेय्या, प्रेमनाथ) दो उस्ताद (१९८२ शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय).


Saturday, March 18, 2023

'या' बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये 36 चा आकडा आहे, त्यांना एकमेकांचा चेहरा पाहणे देखील पसंद नाही


मनोरंजनाच्या ग्लॅमरस दुनियेत अभिनेत्रींमध्ये सन्मान आणि स्टारडमची लढाई अनेकदा पाहायला मिळते. अनेकदा अनेक अभिनेत्रींमध्ये कॅटफाईटही होते. या अभिनेत्रींमधली काही भांडणं एवढं मोठं रूप धारण करतात की, दुभंगलेल्या नजरेनेही ते एकमेकांना पसंत करत नाहीत. फिल्म इंडस्ट्रीमध्येही काही अभिनेत्री आहेत, ज्यांचा आकडा 36 आहे. चला जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल, ज्यांना एकमेकांना पाहायलाही आवडत नाही. 

दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ

या यादीत दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोघी बॉलिवूडच्या टॉप हॉट अभिनेत्रींपैकी एक आहेत. फॅन फॉलोइंगच्या बाबतीतही दोघेही एकमेकांना टक्कर देतात, पण त्यांच्यातील युद्ध केवळ स्टारडमपर्यंतच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही सुरू आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा दीपिका आणि रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दीपिका कतरिनाच्या जवळ आल्यानंतर अभिनेत्याने दीपिकासोबत ब्रेकअप केले होते. तेव्हापासून दीपिका आणि कतरिनाचे नाते बिघडले, जे आजतागायत मिटलेले नाही. 

ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी

ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यातील भांडणही खूप जुने आहे. दोघी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.  त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, 'चलते चलते' या चित्रपटात ऐश्वर्याला पहिल्यांदा शाहरुख खानसोबत नायिकेच्या भूमिकेत कास्ट करण्यात आलं होतं. त्यावेळी ऐश्वर्या सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि सलमान सेटवर खूप गोंधळ घालायचा. यानंतर निर्मात्यांनी ऐश्वर्याला सोडून राणी मुखर्जीकडे वळले आणि तिला चित्रपटात नायिका म्हणून कास्ट केले.  यामुळे ऐश्वर्या राणीवर चिडली होती. 

प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर

बॉलीवूडच्या दोन सुपर हॉट अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्यातही 36 चा आकडा आहे. 'ऐतराज' चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारूनही प्रियांका चोप्राचेच कौतुक होत असताना आणि करीनाला कमी लेखण्यात आल्याने दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. 'कॉफी विथ करण' मधील प्रियांकाच्या उच्चारावर करीनाने टिप्पणी केली आणि तिला खोटे म्हटले तेव्हा हे मतभेद मोठ्या भांडणात बदलले. 

रेखा आणि जया बच्चन

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आणि जया बच्चन यांच्यातील युध्दाची जगाला कल्पना आहे. दोघांमधील युद्धाचे कारणही सर्वश्रुत आहे. जया आणि रेखाच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण बनले बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन. अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चा आजवर इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे.  त्यामुळे रेखा आणि जया यांच्यातील अंतर वाढत गेले, जे आजही कायम आहे.



Friday, March 17, 2023

नव्या चित्रपटात जुनी गाणी, नव्या संगीतात दम नाही ?


रहे ना रहे हम, महका करेंगे, जो वादा किया वो निभाना पड़ेगा, प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्‍यों डरता है दिलं ... सारखी 50 ते 60 वर्षांपूर्वी रचलेली असंख्य गाणी आजही लोकांना रोमांचित करतात. गुणगुणायला लावतात. आजही जुनी गाणी हृदयाला भिडतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकिकडे एआर रहमानच्या संगीतात तयार झालेल्या 'जय हो...' नंतर पुन्हा एकदा साऊथ चित्रपट 'आरआरआर'मधील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करने सन्मानित केले आहे. तर दुसरीकडे आपल्या बॉलीवूडच्या आगामी नवीन चित्रपटांमध्ये जुनी गाणी नव्या ढंगात आणि मोठ्या थाटात सादर केली जात आहेत. अशा परिस्थितीत मूळ गाणी सादर करण्यासाठी बॉलीवूड प्रयत्न का करत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. 

जुनी गाणी रिमिक्स करून नवीन चित्रपटात वापरणे ही तशी खूप जुनी गोष्ट आहे पण आजकाल नवीनच ट्रेंड सुरु झाला आहे. ज्यामध्ये जुनी गाणी नव्या चित्रपटात त्याच शैलीत म्हणजे जशीच्या तशी सादर केली जात आहेत. उदाहरणार्थ, सनी देओल अभिनीत आणि दिग्दर्शित 'चूप' या चित्रपटात, 'जाने क्या तूने कंही जाने क्या मैं ने सुनी' आणि 'ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है...' सारख्या जुन्या 'कागज के फूल' चित्रपटातील गाणी कोणत्याही बदलाशिवाय जशीच्या तशी वापरली गेली आहेत. त्याचप्रमाणे अक्षय कुमारच्या 'सेल्फी' चित्रपटातील 'मैं खिलाडी तू अनारी' हे गाणेही त्याच जुन्या शैलीत सादर करण्यात आले आहे. अजय देवगणच्या आगामी 'भोला' या चित्रपटातील 'आज फिर जीने की तमन्ना है आज फिर मरने का इरादा है' या जुन्या गाण्याची झलक दाखवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, वृत्तानुसार, अमिताभ बच्चन आणि गोविंदा स्टारर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' चे शीर्षक गीत देखील अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे. चित्रपटातील जुनी गाणी कोणताही बदल न करता ठेवण्यामागे काही ना काही कारणंही मांडण्यात आली आहेत. ती कधी कथेच्या मागणीनुसार ठेवण्यात आली आहेत. तर  कधी चित्रपटाच्या कथेशी संबंधित  जुने गाणेही लावले जाते.जुन्या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये जी ताकद आढळते ती नवीन गाण्यांमध्ये नसण्याची अनेक कारणे आहेत.  जसं की आधीच्या गाण्यांचे स्वर खूप चांगले होते पण व्हिडीओ तितकासा चांगला नव्हता. त्यामुळे पूर्वीची गाणी बघण्यापेक्षा ऐकायला चांगली वाटतात. आजकालच्या गाण्यांमध्ये व्हिडीओ चांगला आहे पण गायन तितकेसे शक्तिशाली नाही. ना गाण्याचे बोल शैलीत आहेत ना संगीत दमदार आहे. त्यामुळे 100 पैकी फक्त 10 गाणीच लोकप्रिय होतात. 

बाकीची गाणी कधी आली किंवा गेली हे माहीतही होत नाही. पूर्वीचे संगीत दिग्दर्शक गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी स्टुडिओतील सर्व वादकांना बोलावत आणि प्रत्येक वाद्य स्वतंत्रपणे वाजवलं जाई। जसे की तबला, सारंगी, हार्मोनियम, पियानो, ढोलकी इ. आजचे संगीत दिग्दर्शक सिंथेसायझर वापरतात, ज्यात आधीच सर्व संगीत सामावलेले असते, ज्यामुळे वास्तविक संगीताचा अभाव दिसून येतो. पूर्वीची गाणी गोड आवाजातील  आणि मृदू संगीताच्या अंतर्गत भावनांनी भरलेली होती जी केवळ हृदयापर्यंतच पोहोचत नव्हती तर सामान्य श्रोत्यांनाही ते गाणे सोपे वाटत होते. असे नाही की आजचे गायक सक्षम नाहीत किंवा संगीत दिग्दर्शक आणि गीतकारांमध्ये काही चांगले घडवून आणण्याची ताकद नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे आज विशेषत: हिंदी चित्रपटांमध्ये निर्माते किंवा संगीतकार आपली कला दाखवण्यासाठी फारशी मेहनत घेताना दिसत नाहीत. पूर्वी गाण्याचे बोल लिहून त्यानुसार ट्यून बनवली जात होती, पण आज आधी ट्यून बनवली जाते मग त्यात शब्द टाकले जातात. 

आजही श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, सोनू निगम, अभिजीत इत्यादी काही दिग्गज गायक आहेत. पण असे असूनही, पूर्वीच्या तुलनेत आजची गाणी फार कमी वेळ वाजली जातात. त्यामुळेच आता गायकांनी त्यांचे वैयक्तिक अल्बम बनवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून चित्रपटाच्या अपयशामुळे त्याच्या गाण्याचे आणि करिअरचे नुकसान त्याला सहन करावे लागणार नाही. संगीतकार-गायक हिमेश रेशमियाच्या मते, तो चित्रपटांपेक्षा त्याच्या अल्बमवर अधिक लक्ष केंद्रित करतो कारण त्याने संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाच्या अपयशामुळे त्याच्या संगीत कारकिर्दीवर परिणाम होऊ नये असे त्याला वाटते.


Thursday, March 16, 2023

नवाजुद्दीनच्या आधीही अनेक कलाकारांनी चित्रपटात महिला भूमिका साकारल्या. यात काहींची वाहवा झाली, काहींना नाकारण्यात आलं


नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा अनुभवी अभिनेता आहे. अनेक दमदार भूमिका साकारून त्यांनी लोकांना आपले फॅन बनवले आहे. नवाजचा पुढचा चित्रपट 'हड्डी' आहे.  नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात त्याने महिलांचे कपडे घातले आहेत. यात तो 'हिजाड्या'ची भूमिका साकारत आहे. अशा प्रकारची भूमिका तो पहिल्यांदाच साकारत आहे. यापूर्वी सदाशिव अमरापूरकर यांनीदेखील हिजाड्याची, 'महारानी' ची भूमिका संजय दत्त आणि पूजा भट्ट चित्रपटात साकारली होती. सुमधूर गाणी आणि ऍक्शन थ्रिलर असल्याने हा चित्रपट गाजला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सदाशिव अमरापूरकर यांनी महिलांचे कपडे घालून हिजाड्याची भूमिका साकारली असली तरी आपल्या बॉलिवूडमध्ये पुरुष कलाकारांनी स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. काही कलाकारांनी तात्पुरत्या स्वरूपात महिलांचे कपडे घातले आहेत तर काहींनी भूमिकेची मागणी होती म्हणून महिलांचे कपडे परिधान केले होते. मात्र काहींच्या स्त्री भूमिकांचे खरोखरच कौतुक झाले. तर काहींना नापसंदही केलं गेलं. बॉलिवूडमधील काही मोठ्या कलाकारांनी महिलांच्या 'गेटअप' मोह आवरला नाही. 'लावारीस' चित्रपटातील 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है' या गाण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी स्त्री वेशभूषा धारण केली होती. त्या गेटअपमधला अमिताभ चांगलाच पसंद केला गेला होता.  आजही अमिताभचे ते गाणे खूप लोकप्रिय आहे.

विशेष करून पुरुष कलाकारांनी महिलांचे कपडे परिधान करून कॉमेडीच अधिक केली आहे. अमिताभ बच्चन, गोविंदा, श्रेयस तळपदे, जावेद जाफरी अशा कालाकारांनी कॉमेडीच केली आहे. 'बाजी' चित्रपटातील  'डोले डोले दिल' या गाण्यात आमिर खान महिला गेटअपमध्ये दिसला होता.या चित्रपटाने फार काही व्यवसाय केला नाही पण आमिर खानचा तो 'लूक' लोकांना पसंद पडला. सैफ अली खान आणि राम कपूर आणि रितेश देशमुख यांनी 'हमशकल' चित्रपटात मुलींचा गेटअप घेतला होता. त्यांनी यात कॉमेडी केली होती. हा चित्रपट चालला नसला तरी त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते. 'चाची 420' मध्ये कमल हसन याने महिलेची भूमिका साकारली होती. कमल हसन कोणतीही भूमिका फार विचारपूर्वक आणि प्रचंड मेहनतीने साकारतात. त्यांनी 'अप्पू राजा', 'मेयर साब', 'हिंदुस्थानी' अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या, गेटअपच्या भूमिका साकारल्या आहेत. इतक्या वैविध्य असलेल्या भूमिका क्वचितच कलाकाराने साकारल्या असतील. मात्र 'चाची 420' हा चित्रपट आणि पात्र कमल हासनच्या सर्वात यशस्वी पात्रांपैकी एक आहे. 

'जानेमन' चित्रपटात सलमान खानही मुलीच्या गेटअपमध्ये दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि लोकांना सलमानची भूमिका फारशी आवडली नाही. 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटातदेखील रितेश देशमुखने सोनिया नावाच्या महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील रितेशच्या भूमिकेचे लोकांनी चांगलेच कौतुक केले.'पेइंग गेस्ट' या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदेने स्त्रीची भूमिका साकारली होती. मात्र, या व्यक्तिरेखेत लोकांना विशेष दिसून आले नाही. चित्रपट प्लॉप ठरला. गोविंदाने 'आंटी नंबर वन' मधील स्त्री पात्र साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. 'आंटी नंबर 1' या चित्रपटात गोविंदाने आंटीची सुंदर भूमिका साकारली होती ते तुम्हाला आठवत असेलच.  गुलाबी लेहेंग्यापासून ते लाल साडीपर्यंत सर्व काही गोविंदाने परिधान केले आहे. हा चित्रपटही सुपरहिट ठरला आणि गोविंदालाही खूप पसंती मिळाली. आयुष्मान खुराना यानेदेखील 'ड्रीम गर्ल' या चित्रपटात एका महिलेची भूमिका साकारली होती. 

संजय दत्तने बॉलीवूडमध्ये अॅक्शन हिरोंच्या भूमिकेसह अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तोही 'मेरा फैसला' या चित्रपटात एका महिलेच्या भूमिकेत आला होता. ऋषी कपूर हा अतिशय देखणा हिरो. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपण एक सुंदर नायिकाही बनू शकतो.  ऋषी कपूर यांनीही 'रफुचक्कर' या चित्रपटात  स्त्री पात्र साकारले आहेच पण गाण्यांवर डान्सदेखील  केला आहे.  अजय देवगण, आर्षद वारसी हेदेखील 'गोलमाल' चित्रपट काही काळ स्त्री वेशात वावरले. याचा अर्थ अँग्री यंग मॅन, दबंग, सिंगम वेशात पडद्यावर वावणाऱ्या पुरुष कलाकारांना स्त्री वेशाचाही मोह आवरला नाही.


Wednesday, March 15, 2023

रोहित शेट्टीचे 8 वर्षांत सलग 7 ब्लॉकबस्टर चित्रपट


'सूर्यवंशी', 'सिम्बा', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'सिंघम' आणि 'गोलमाल अगेन' सारखे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीकडे सक्सेस मंत्रा आहे. रोहित हा प्रसिद्ध फाईट मास्टर एमबी शेट्टी यांचा मुलगा आहे. लोक त्यांना फायटर शेट्टी या नावानेही ओळखतात. रोहितचा जन्म 14 मार्च 1973 रोजीचा. रोहितने बालपणीच चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आपल्या वडिलांसारखे व्हायचे होते. तो 11 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर घर विकायची वेळ आली. आर्थिक परिस्थिती एवढी बेताची होती की, त्यांना घराचे भाडे देणेही अवघड झाले होते, त्यामुळे त्यांना आजीच्या घरी राहावे लागले. रोहितच्या आईने अंधेरी फिल्म हबमधील मत्राज स्टुडिओमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. रोहितने लहानपणी आदर, संपत्ती आणि प्रसिद्धी पाहिली होती, परंतु अचानक सर्वकाही संपले होते. ते फिल्म इंडस्ट्रीतील असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये कोणतेही कष्ट न करता काम मिळाले. असा गैरसमज आहे. त्यांना कधीकधी खाणे आणि काम करणे यापैकी एक निवडणे हा सर्वात कठीण निर्णय होता. आधी ते सांताक्रूझला राहत होतो, नंतर दहिसरला शिफ्ट झाले. तिथे ते त्यांच्या आजीसोबत राहत होते.

1991 मध्ये आर्थिक अडचणींमुळे रोहितला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. वयाच्या 15 व्या वर्षी रोहितने कुकू कोहलीसोबत 'फूल और कांटे' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. एका मुलाखतीत रोहित म्हणाला- कोणत्याही मुलाने अभ्यास सोडून नोकरी करावी असे मला वाटत नाही. शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे, परंतु कधीकधी आपली परिस्थिती कठीण असते. जेव्हा जेव्हा मी '3 इडियट्स' किंवा 'रंग दे बसंती' सारखे चित्रपट पाहतो तेव्हा मला असे वाटते की, मी फारसा शिकलेलो नसल्याने असे चित्रपट कधीच करू शकणार नाही. 'फूल और कांटे' या चित्रपटातून अजय देवगण पदार्पण करत होता. या चित्रपटाच्या सेटवर रोहित आणि अजय देवगणची मैत्री झाली. अजय हा अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा आहे. या चित्रपटाच्या सेटवर रोहित प्रथमच वीरू देवगण यांना भेटला, ते चित्रपटाच्या स्टंट्सची कोरिओग्राफी करत असत.

अजय देवगणने 'दिल क्या करे' आणि 'राजू चाचा' या चित्रपटांद्वारे त्याच्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. यासोबत रोहित शेट्टी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. 'राजू चाचा' हा बिग बजेट चित्रपट होता, पण हा चित्रपट तिकीटबारीवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. यामुळे अजय देवगणला खूप त्रास सहन करावा लागला. अजय आणि रोहितला दोन वर्षे प्रोडक्शन हाऊस बंद करावे लागले. सर्व कर्ज परत केल्यानंतर त्यांनी 'जमीन'मध्ये एकत्र दिग्दर्शन केले.

2003 ते 2006 हा काळ दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीसाठी सर्वात वाईट काळ होता. रोहितने 'गोलमाल'च्या स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली. काम पूर्ण झाल्यानंतरही एकही अभिनेता चित्रपटात काम करण्यास तयार नव्हता. कोणत्याही प्रोडक्शन हाऊसने रोहितसोबत करारही केला नाही. 2006 मध्ये 'गोलमाल' रिलीज झाल्यानंतर रोहितचे नशीब पालटले. चित्रपट निर्माते नीरज व्होरा यांनी रोहितला 'अफलातून' नावाचे नाटक सांगितले. रोहितला या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करायचे होते. त्यादरम्यान धिलिन मेहता यांच्या श्री अष्टविनायक सिने व्हिजन नावाच्या निर्मिती संस्थेने रोहित शेट्टी आणि इम्तियाज अली यांना करारबद्ध केले. 'गोलमाल' चित्रपटाच्या रिलीजने रोहितच्या नावावर कॉमेडी फ्रँचायझी जोडली. 80 च्या दशकानंतरचा दिग्दर्शक रोहित शेट्टी हा मनमोहन देसाईंनंतरचा पहिला दिग्दर्शक आहे ज्याचे सलग सात चित्रपट हिट झाले. यामुळे रोहितला बॉक्स ऑफिसचा प्रेसिडेंट देखील म्हटले जाते. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी खालिद मुहम्मद डॉक्युमेंट्रीमध्ये रोहित शेट्टीची स्वतःच फिल्म स्कूल असल्याचे म्हटले होते. त्याच्यासारखा चित्रपट कोणी बनवू शकत नाही.

Monday, March 13, 2023

मराठी अभिनेता भाऊसाहेब शिंदे याने कोणकोणत्या मराठी चित्रपटात काम केले आहे?


1. मराठी अभिनेता भाऊसाहेब शिंदे याने कोणकोणत्या मराठी चित्रपटात काम केले आहे?

उत्तर- राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा, बबन आणि रौन्दळ. 

2. मराठी अभिनेता सौरभ गोखले याने कोणकोणत्या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे?

उत्तर- सौरभ गोखलेचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. शिक्षणानंतर काही काळ ‘टाटा मोटर्स’मध्ये नोकरीही केली. परंतु, महाविद्यालयीन स्तरावर पुरुषोत्तम करंडकसारख्या दर्जेदार स्पर्धांमधून भाग घेतला असल्यामुळे त्याचा कल कला क्षेत्राकडे होता. ‘श्रीमंत बाजीराव पेशवा मस्तानी’ या मालिकेद्वारे त्याला पहिल्यांदा कला क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. परंतु, ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘मांडला दोन घडींचा डाव’, ‘उंच माझा झोका’, ‘अरुंधती’, ‘एक मोहर आभाळ’ या त्याच्या इतर लोकप्रिय मालिका. २०१५ मधील ‘योद्धा’ चित्रपटाद्वारे त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘शिनमा’, ‘परतु’, ‘भो भो’, ‘तलाव’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हे त्याचे काही उल्लेखनीय मराठी चित्रपट.२०२२ मध्ये 'सर्कस', ‘सिंबा’ या हिंदी चित्रपटामधील गौरव रानडेची त्याने साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंदीस उतरली.

3. बालपणापासून चित्रपट क्षेत्रात काम करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय?

उत्तर- डॅम इट आणि बरंच काही. कोठारे यांनी 'डॅम इट' या  संवादाला  जन्म दिला आहे, त्यामुळे 'धुमधडाका'मध्ये तो शब्द संवादात आपोआप आला. 'धुमधडाका'च्या नंतर आलेल्या 'दे दणादण'मध्येही हा शब्द बऱ्याचदा आला; परंतु, तो 'थरथराट'मधून'  खूप लोकप्रिय झाला आणि तो कोठारे यांचा  ओळख बनला. याशिवाय टकलू हैवान, कवठ्या महांकाळ, . तात्या विंचू हे सारे चित्रविचित्र, शब्द कोठारेंच्या पात्रांची विशेषत: खलनायकांची ओळख बनली. 

4. पार्श्वगायिका साधना सरगम यांचा जन्म कोठे झाला?

उत्तर- ७ मार्च १९७४ रोजी जन्मलेल्या साधना सरगम यांचे खरे नाव साधना घाणेकर. त्यांचा जन्म दाभोळ येथे झाला. बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या.  साधना सरगम यांनी १९७८ मध्ये आलेल्या फिल्म ‘तृष्णा’साठी कोरस गायले होते. त्या गाण्याचे बोल होते ‘पम परम पम बोले जीवन की सरगम’. या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरसाज चढवला होता. साधना सहा वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ हे बोल असलेले गीत गायले होते. त्यानंतर साधना यांनी वयाच्या सातव्या  वर्षीपासून पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. १९८२ मध्ये आलेल्या ‘विधाता’ या चित्रपटातील ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन साधना सरगम यांनी बॉलिवूडमध्ये धमाल केली होती.  दाक्षिणात्य गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या साधना पहिल्या नॉन साऊथ इंडियन गायिका आहेत. उदित नारायण यांच्यासोबत ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातील गाजलेले गाणे ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धी झोतात आल्या. आजवर 34 विविध भाषांत त्या गायल्या आहेत. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’, ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ अशी अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. साधना सरगम यांनी अंदाजे १५०० चित्रपटात २०००च्या वर हिंदीत गाणी गायली आहेत. ५०० हून अधिक तामिळ चित्रपटात १००० च्या वर तामिळ गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. १९९४ ते २०१५ याकाळात साधना सरगम यांनी २५०० हून अधिक बंगाली गीत गायली आहेत. त्यांनी मराठी, तेलुगु , कन्नड, मल्याळम, गुजराती, नेपाली आणि अनेक प्रादेशिक भाषेत गाणी गायली आहेत. मध्यप्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर अवॉर्डने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९८८ आणि २००४ मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. साधना यांना साऊथच्या फिल्मफेअर अवॉर्डसोबतच पाचवेळा महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. ‘सारेच सज्जन’, ‘माहेरची सावली’, ‘जोडीदार’, ‘आधार’, ‘सरीवर सरी’, ‘एक होती वादी’, ‘एवढंसं आभाळ’, ‘आईशप्पथ’ आदी मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

5. प्रश्न- 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात कोणकोणत्या अभिनेत्री काम करीत आहेत?

उत्तर- 'बाईपण भारी देवा' 30 जूनला प्रदर्शित होणार आहे. सहा बहिणींची गोष्ट आहे. ज्यात प्रेम, माया, तडजोड, जिद्द, ध्येय, दुःख, स्वार्थ अशा अनेक भावनांचा खजिना आहे. स्त्रीच्या वेगवेगळ्या छटा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करतात.  जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, मार्धुरी भोसलेनिर्मित आणि केदार शिंदेद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांसारखे दर्जेदार कलाकार आहेत. 


Friday, March 10, 2023

साऊथचे रिमेक चित्रपट होताहेत फ्लॉप


तीन-चार वर्षांपासून हिंदी चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांनी पूर्वीप्रमाणे 300-400 कोटींचा व्यवसाय करावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी साऊथच्या यशस्वी चित्रपटांचा रिमेक बनवायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक रिमेक चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला.आणि इथूनच अशा चित्रपटांचे युग सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात रिमेक चित्रपट यशस्वी होऊ लागले. त्यामुळे अनेक निर्माते असे चित्रपट बनवायला लागले. दक्षिणेत यशस्वी ठरलेल्या चित्रपटांचेच रिमेक निर्माते करू लागले. मात्र आता चित्र बदलायला लागले आहे. अलीकडचे काही फ्लॉप चित्रपट पाहिले तर असे लक्षात येते की, दक्षिणेतील चित्रपटांच्या हिंदी रिमेकला प्रेक्षक नाकारताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा रिमेक चित्रपटांचे भविष्य काय असेल, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

खरं तर बऱ्याच काळापासून बॉलिवूड निर्माते दक्षिण चित्रपटांचा रिमेक बनवू लागले आहेत. सुरुवातीच्या काळात त्याला यशही दणक्यात मिळत गेले. मुन्ना भाई एमबीबीएस, हाउसफुल, कबीर सिंह, दृश्यम ,वॉन्टेड ,गजनी, युवा, भूल भुलैया या चित्रपटांनी चांगली कमाई केली. या चित्रपटांना यश मिळण्याचे  कारण असे की जेव्हा साऊथचे चित्रपट रिमेक झाले तेव्हा कथा एकच असली तरी चित्रपटाची संपूर्ण निर्मिती खूप वेगळी आणि स्वतंत्र होती. हिंदी प्रेक्षकांचा विचार करून चित्रपट बनवले जात. पण आज निर्माते चर्चित दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनवत आहेत. पण
त्यात आता वेगळा बदल झालेला दिसत नाही. चित्रपट जसेच्या तसे बनवले जात आहेत. प्रत्येक सीन एखाद्या साऊथ चित्रपटासारखा चित्रित केला जात आहे.  कलाकारांव्यतिरिक्त, चित्रपटातील सर्व काही मूळ चित्रपटासारखेच राहते. अशा परिस्थितीत बॉलीवूडने बनवलेल्या साऊथ चित्रपटांचा रिमेक प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षक मूळ चित्रपट ओटीटीवर पाहिलेले असतात. अशा स्थितीत मूळ चित्रपट पाहिला गेला असताना, रिमेकमध्ये नेमका तोच चित्रपट पाहण्यात प्रेक्षकांना रस वाटत नाही. इतकंच नव्हे तर गाणीदेखील मूळ चित्रपटातीलच  टाकली जातात. त्यामुळेच बड्या स्टार्सच्या बिग बजेट रिमेक चित्रपटांनाही या चित्रपटात नवीन काहीही नसल्यामुळे फटका बसत आहे. एखादी गोष्ट वारंवार केली तर त्याचा कंटाळा येतो.

साऊथ चित्रपटांचे रिमेक ही आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. ही देवाणघेवाण प्रत्येक दशकात होत असते. एक तर दक्षिणेकडील चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या उपलब्ध असल्यामुळे बहुतेक प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहिलेला असतो, साहजिकच मग इथे हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांची संख्या कमी भेटते. दुसरं म्हणजे प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्नही निर्माण होतो की पुन्हा पुन्हा रिमेक का निर्माण केले जातात? किंवा असले चित्रपट पुन्हा पुन्हा का पाहायचे? आपण आपले खरे चित्रपट  का निर्माण करू शकत नाही? तिसरे म्हणजे, दक्षिण आणि उत्तरेकडील भावनिकतेत थोडा फार फरक आहे, अशा परिस्थितीत अचूक नकल करणे थोडे कठीण जाते. त्यामुळे आगामी काळात निर्मात्यांनी येणाऱ्या चित्रपटांचा रिमेक करताना विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे. विचारमंथन आवश्यक आहे.  अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन सारख्या बड्या कलाकारांचे फ्लॉप चित्रपट पाहिल्यावर समजू शकतो.

अक्षय कुमारचा 'सेल्फी' आणि कार्तिक आर्यनचा 'शहजादा' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यावर रिमेक चित्रपट बनवणारे अनेक बॉलिवूड निर्माते आता घाबरले आहेत.त्यामुळे काही निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. तर काही निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटांमध्ये काही बदल करण्यास सुरुवात केली आहे.अजय देवगण रिमेकच्या बाबतीत नशीबवान ठरला आहे कारण त्याचे दोन्ही दाक्षिणात्य रिमेक 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' यशस्वी झाले आहेत. त्यामुळे अजय देवगणलाही 'भोला'कडून खूप आशा आहेत. अजय देवगणचा 'दृश्यम 3' देखील याच वर्षी रिलीज होणार आहे.  तसेच 'पुष्पा 2', 'कंतारा 2' देखील याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत.आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा साऊथ चित्रपट 'थडम'चा रिमेक आहे. सूर्या या नावाने जोसेफचा रिमेक बनवला जात आहे.  दाक्षिणात्य चित्रपट स्टार्टअपच्या रिमेकमध्ये अक्षय कुमार आणि राधिका मदान दिसणार आहेत. सान्या मल्होत्रा ​​'द ग्रेट इंडियन किचन'च्या रिमेक चित्रपटात दिसणार आहे.छत्रपतीच्या रिमेकमध्ये दाक्षिणात्य अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास दिसणार आहे. साहजिकच साऊथच्या रिमेक चित्रपटांना एकापाठोपाठ एक फटका बसला तर बॉलीवूडचे मोठे नुकसान होईल. अशा परिस्थितीत कोणताही रिमेक चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याकडे खूप लक्ष देणे गरजेचे आहे.  -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday, March 9, 2023

चित्रपटगृहांतून गायब झाले स्त्रीप्रधान चित्रपट


दोन वर्षांपूर्वी, जेव्हा अभिनेत्री राधिका आपटेने कोरोना संक्रमण काळात सलग 35 दिवस कोलकाता येथे तिचा 'मिसेस अंडरकव्हर' चित्रपट शूट केला, तेव्हा तिचं खूपच कौतुक झालं. तिच्या चाहत्यांना वाटलं की बऱ्याच दिवसांनी एक मजेदार अॅक्शनपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. पण, कोरोना संक्रमणादरम्यान आणि नंतर चित्रपटांबाबतची प्रेक्षकांची जी 'चव' बदलली, त्यामुळे तिथून चित्रपटगृहांमध्ये स्त्रीप्रधान चित्रपट प्रदर्शित होणे जवळपास अशक्य झाले. कंगना राणौतच्या 'धाकड' ची केविलवाणी अवस्था पाहू। निर्माते अशा चित्रपटांना लांबूनच नमस्कार घालू लागले. परिस्थिती अशी झाली आहे की, 'डर्टी पिक्चर' आणि 'कहानी' सारख्या चित्रपटांद्वारे धमाल उडवणाऱ्या विद्या बालनचे नंतरचे तीन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. तापसी पन्नू, यामी गौतम, सारा अली खानपासून राधिका आपटेपर्यंत प्रत्येकीची अवस्था एकसारखीच बनली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी, OTT ZEE5 ने स्पष्ट केले आहे की राधिका आपटेचा पुढील चित्रपट 'मिसेस अंडरकव्हर' हा तिचा मूळ चित्रपट म्हणून प्रदर्शित होईल. याआधी राधिकाचे 'रात अकेली', 'फॉरेंसिक', 'लस्ट स्टोरी', 'मोनिका ओ माय डार्लिंग' सारखे चित्रपट देखील OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. मात्र, एकेकाळी नेटफ्लिक्सची इन-हाऊस हिरोईन अशी बिरुदावली मिळवलेल्या राधिका आपटेने मात्र अजून हिंमत हरली नाही. ती म्हणते, 'ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त पात्र कलाकारांनाच संधी मिळते, स्टार सिस्टीम आता संपली आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होवो किंवा ओटीटीवर, आव्हान हे सर्व ठिकाणी असतेच. एक मात्र खरे की, आजकाल निर्माते OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्यात स्वतःला सुरक्षित समजू लागले आहेत.

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचे मोठ्या पडद्यावरील नाते जवळपास संपुष्टात आले आहे. तिचा पुढचा 'गॅसलाइट' हा चित्रपटदेखील थेट OTT वर प्रदर्शित होणार आहे. याआधीचे तिचे 'कुली नंबर वन' आणि 'अतरंगी रे' हे दोन्ही सिनेमे फक्त OTT वर रिलीज झाले होते. यावर बोलताना सारा अली खान म्हणते, 'आता थिएटर हे मनोरंजनाचे एकमेव माध्यम राहिलेले नाही. जर आशय चांगला असेल तर तो थिएटर असो वा ओटीटी सर्वत्र चालतो.' ओटीटी स्टार्सची ब्रँड व्हॅल्यू आगामी काळात तरी अजून सिने स्टार्सच्या ब्रँड व्हॅल्यूशी जुळताना दिसत नाही.

यामी गौतमचा नुकताच 'लॉस्ट' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. याआधी तिचे 'अ थर्सडे' आणि 'दसवीं'' हे चित्रपटही केवळ OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. यामी गौतम म्हणते, 'चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होवो किंवा  थिएटरमध्ये हा ट्रेंड सुरू राहायला हवा. ओटीटीच्या आगमनाचा निश्चितच इतका फायदा झाला आहे की आता स्त्री पात्रांना लक्षात घेऊन कथा लिहिल्या जात आहेत.

लॉकडाऊन दरम्यान विद्या बालनचा 'शकुंतला देवी' OTT वर रिलीज झाला, तेव्हा  त्याने व्ह्यूजचा विक्रम केला. पण नंतर तिचे आणखी दोन चित्रपट 'शेरनी' आणि 'जलसा' देखील ओटीटीवर आले, या चित्रपटांना मात्र प्रतिसाद थंडा मिळाला. आता विद्या बालन रोजच सोशल मीडियावर रील बनवताना दिसत आहे. विद्या बालन म्हणते, 'थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची एक वेगळीच मजा आहे, आता OTT वर चित्रपट प्रदर्शित करतात की थिएटरमध्ये ते चित्रपटाच्या निर्मात्यावर अवलंबून आहे, जेव्हा माझे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले तेव्हाही तेवढेच प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आणि आता OTT वरही मिळत आहे.

सोशल मीडियावर चोवीस तास दिसणार्‍या जान्हवी कपूरचे आकर्षणही चित्रपट पाहणार्‍यांमध्ये सातत्याने कमी होताना दिसत आहे. 'गुंजन सक्सेना'ने ओटीटीवर पदार्पण केले.  त्यानंतर तिचा 'गुड लक जेरी' हा चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. दरम्यान तिचे 'रुही' आणि 'मिली' हे दोन चित्रपट सिनेमागृहात पोहोचले मात्र प्रेक्षकांनी तिच्याबद्दल फारशी उत्सुकता दाखवली नाही. जान्हवी म्हणते की ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करणे कमी जोखमीचे आहे आणि लोक तुमचा चित्रपट पाहतील याची खात्री आहे, मात्र चित्रपटगृहात चित्रपट पाहणे ही एक वेगळी मजा आहे.

तापसी पन्नू आजकाल शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटातील भूमिकेमुळे खूश आहे, परंतु तिला ओटीटीची आवडती नायिका म्हणून लेबल लावले गेले आहे. 'हसीन दिलरुबा', 'रश्मी रॉकेट' 'लूप लपेटा' 'तडका' आणि 'ब्लर' सारखे चित्रपट फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकले. मधल्या काळात 'दोबारा' आणि 'शाबाश मिठू' सारखे चित्रपट चित्रपटगृहात आले नाहीत. ती असेही मानते, 'महिला कलाकारांच्या चित्रपटांना नेहमीच मोठ्या स्टार्सच्या तुलनेत कमी स्क्रीन मिळतात. थिएटरमध्ये नेहमीच भेदभाव केला जातो याबद्दल मला नेहमीच खंत आहे.

'पुष्पा द राईज'मधून पॅन इंडियाची स्टार बनण्याचे स्वप्न पाहणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला मोठ्या पडद्यावर 'गुड बाय' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टी प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारले. तिचा दुसरा चित्रपट 'मिशन मजनू' थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ती इतर अभिनेत्रींच्या तुलनेत थोडी चांगली स्थितीत आहे कारण तिच्याकडे 'अॅनिमल' आणि 'पुष्पा द रुल' सारखे काही बिग बजेट चित्रपट आहेत. या हिंदी चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मधुर भांडारकर दिग्दर्शित तमन्ना भाटियाचा 'बबली बाऊन्सर' चित्रपटालाही थिएटर्स मिळाले नाहीत आणि तो ओटीटीवर प्रदर्शित झाला. तमन्ना भाटिया याविषयी सांगते की, OTT मधून आता स्टारडमचे युग संपले आहे. आता फक्त कलाकार आणि चांगला कंटेंट चालतील, मग ते ओटीटी असो किंवा थिएटर. मात्र, ओटीटीवरही तिच्या चित्रपटांना  लोकांनी स्वीकारले नाही.

Monday, March 6, 2023

भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. यांनी कोणत्या हिंदी चित्रपटातून बालकलाकर म्हणून सुरुवात केली होती?


1.भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर  हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.  यांनी कोणत्या हिंदी चित्रपटातून बालकलाकर म्हणून सुरुवात केली होती?

उत्तर- 'द बर्निंग ट्रेन' (1980) या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून खुशबू यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.  त्यांनी अनेक तेलगू, कन्नड, मल्याळम चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे.

2.अभिनेत्री करिना कपूर खान व करिश्मा कपूर यांचे पालक कोण आहेत?
उत्तर- रणधीर कपूर व बबिता  हे अभिनेत्री करिना कपूर खान व करिश्मा कपूर यांचे पालक आहेत. रणधीर आणि बबिता घटस्फोटन घेता  मागच्या 35 वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. अलीकडेच त्यांच्यातला दुरावा संपला आहे. रणधीर व बबिता यांनी 1971 मध्ये प्रेमविवाह केला होता आणि नंतर 1988 मध्ये ते वेगळे झाले. इतके दिवस दूर राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. मार्च 2023 मध्ये ते पुन्हा एकत्र राहत आहेत.

3.' विरजण' (2023) या मराठी चित्रपटातील 'देवा' या गाण्याला कोणी आपला सुमधुर स्वरसाज चढवलाय?
उत्तर- तेलुगू गायिका 'सत्यावथी मंगली' हिने 'विरजण' (2023) या मराठी चित्रपटातील 'देवा' या गाण्याला कोणी आपला सुमधुर स्वरसाज चढवलाय. प्रशांत सातोसे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे; तर या गाण्याचे बोल विनायक पवार यांचे आहेत. हा चित्रपट जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, तसेच सागर जैन, हृषभ कोठारी आणि राजू तोडसाम निर्मित आहे. कपिल जोंधळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात सोहम चाकणकर आणि शिल्पा ठाकरे मुख्य भूमिकेत आहेत.

4. अभिनेता, दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी कोणकोणत्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे?
उत्तर- एक रात्र मंतरलेली’, ‘समांतर’, ‘रिटा’, ‘अनुदिनी’, ‘सॅटर्डे संडे’, ‘पन्हाळा’ हे मकरंदचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. 'दगडी चाळ २', 'आठवा रंग प्रेमाचा' हे मकरंद देशपांडे यांचे २०२२ मधील उल्लेखनीय चित्रपट.

5. अभिनेता मकरंद देशपांडे यांनी कोणकोणत्या हिंदी चित्रपटांमध्ये  भूमिका केल्या आहेत.
उत्तर-  ‘रिस्क’, ‘डरना जरूरी है’, ‘हनन’, ‘एक से बढकर एक’, ‘स्वदेश’, ‘चमेली’, ‘विस्फोट’, ‘मकडी’, ‘लाल सलाम’, ‘रोड’, ‘प्यार दिवाना होता है’, ‘जंगल’, ‘घात’, ‘सरफरोश’, ‘सत्या’, ‘उडान’, ‘नाजायज’, ‘अंत’, ‘तडीपार’, ‘पहला नशा’, ‘सर’ इत्यादी चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

6. 'बुगडी माझी सांडली गं,' 'मला हो म्हणत्यात लवंगी मिरची', 'कसं काय पाटील बरं हाय का?', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला', 'पदरावरती मोर नाचरा हवा' यांसारख्या सुप्रसिद्ध लावण्यांना संगीत देणाऱ्या संगीतकाराचे नाव काय?
उत्तर- संगीतकार वसंत पवार

7. दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी काही सांगा.
उत्तर- दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी 2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला.  त्यांनी द्रमुकमधून राजकारणात प्रवेश केला.  त्यानंतर 2014 पर्यंत त्या द्रमुकमध्ये राहिल्या.  2014 मध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2020 मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रभावाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

8. निळू फुले यांनी अमिताभ बच्चनसोबत कोणत्या चित्रपटात काम केले आहे?
उत्तर- निळू फुले यांनी 'नथू मामा’ ची भूमिका असलेल्या ‘कुली’ या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत काम केले आहे.

9. निळू फुले यांनी कोणकोणत्या हिंदी चित्रपटात काम केले आहे?
उत्तर- औरत तेरी यही कहानी, सुत्रधार, हिरासत, सारांश, कुली, प्रेमप्रतिज्ञा, वो सात दिन, बिजली, दो लडके दोनो कडके, मशाल, तमाचा, जरासी जिंदगी, नरम गरम, सौ दिन सांस के, कब्जा, मां बेटी, मेरी बिवी की शादी, मोहरे, इन्साफ की आवाज, भयानक, पुर्णसत्य, सर्वसाक्षी, कांच की दिवार, दिशा आदी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

10. 2013 साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने  या अभिनेत्रीला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. या अभिनेत्रीचे नाव काय?
उत्तर- सई ताम्हणकर. एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे तसेच ती सांगली येथील प्रसिद्ध चिंतामण महाविदयालयाची विदयार्थीनी आहे. तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती कॉलेजमधील अनेक नाटक व एकाकिंका मध्ये भाग घेत होती

Saturday, March 4, 2023

नागराज मंजुळे प्रस्तुत 'घर बंदूक बिर्याणी' हा चित्रपट कोणकोणत्या भाषेत प्रदर्शित होणार आहे?

 


1. 'नानी 'तेरी मोरनी को मोर ले गई.. ' (मासुम 1960) हे गाणे कोणत्या बालकलाकाराने गायले आहे?

उत्तर- संगीत दिग्दर्शक हेमंतकुमार यांची कन्या रानू मुखर्जी हिने हे गीत गायले आहे.

2. आर डी. बर्मन यांनी  'मासूम' मध्ये 'लकडी की  काठी का घोडा' हे गीत कोणाकडून गाऊन घेतले होते?

उत्तर- वनिता मिश्रा, गुरप्रीत कौर आणि गौरी बापट या लहान गायक कलाकारांकडून गाऊन  घेतले होते.

3. गायक आणि गायक मुलांची नावे सांगा.

उत्तर- किशोर कुमार- अमितकुमार, हेमंतकुमार- रानू मुखर्जी, अनुराधा पौडवाल- कविता पौडवाल, उदित नारायण- आदित्य नारायण, तलत महमूद- खालिद महमूद, महंमद रफी- शाहिद रफी, मुकेश- नितीन मुकेश 

4. अशोक कुमार - नलिनी जयवंत अभिनित 'काफ़िला' (1952) या चित्रपटात खलनायकाची भूमिका कोणी साकारली होती?

उत्तर- मोतीलाल

5. मोतीलाल यांच्या पहिल्या ' शहर का जादू' (1934) या चित्रपटाची नायिका कोण? दिग्दर्शक कोण?

उत्तर- दिग्दर्शक के.पी. घोष यांनी पहिल्यांदा मोतीलाल यांना ' शहर का जादू' चित्रपटात ब्रेक दिला. या चित्रपटाची नायिका होती सबिना देवी. 

6. कोणत्या चित्रपटासाठी मोतीलाल यांना सर्वाधिक एक लाख रुपये मानधन मिळाले होते?

उत्तर- पद्मिनीबरोबरचा 'मि. संपत' हा चित्रपट अतिशय गाजला. या चित्रपटासाठी मोतीलाल यांना सर्वाधिक मानधन मिळाले होते.

7. गायक- अभिनेत्री सुरैय्या हिने के. एल. सैगल यांच्यासोबत कोणकोणत्या चित्रपटात गाणी गायली?

उत्तर- के. एल. सैगल हे सुरैय्या हिच्या गाण्याचे दैवत.  तिच्या गाण्याने प्रभावित झाले होते. सैगल यांच्याबरोबर  तिने 'तसबीर', 'उमर खय्याम' व “परवाना' अशा तीन चित्रपटांत ती गायली.

8. या अभिनेत्रीने आपल्याशी लग्नं करावे, म्हणून अभिनेत्री बिनाचा भाऊ तिच्या दारात उपोषणाला  बसला होता. तिचा एक पाकिस्तानी आशिक तर तिच्याशी निकाह लावण्यासाठी बँड-बाजासह वरात घेऊन तिच्या दारात गेला होता. मात्र या अभिनेत्रीचे प्रेम देव आनंदवर होते. या अभिनेत्रीचे नाव काय?

उत्तर- गायक- अभिनेत्री सुरैय्या. 

9.गायक मन्ना डे यांचे खरे नाव काय? त्यांचा जन्म कधी आणि कोठे झाला?

उत्तर- गायक मन्ना डे यांचे खरे नाव सुबोधचंद्र डे। त्यांचा जन्म एक मे 1919 रोजी कोलकाता येथे झाला. 

10. नागराज मंजुळे प्रस्तुत 'घर बंदूक बिर्याणी' हा चित्रपट कोणकोणत्या भाषेत प्रदर्शित होणार आहे?

उत्तर- मराठी, हिंदी तेलुगू आणि तामिळ भाषेत 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिर्याणी' चित्रपटातील 'गुन गुन' या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

अभिनेत्री नादिरा यांचे मूळ नाव काय?


1.संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या कोणत्याही पाच गाजलेल्या गाण्यांची नावे लिहा.

उत्तर- 1) ओ नीले गगनके तले धरती का प्यार  मिले (हमराज), 2) किसी पत्थर की मूरत से मोहब्बत का इरादा है..(हमराज) , 3) ओ मेरी जोहरा जबीं तू अभी तक है हंसीं और में जवान (वक्त) , 4) इन्हीं हवाओं में इन्ही फिजाओं में तुझ को मेरा प्यार पुकारे (गुमराह) 5) चलो एक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों (गुमराह) , आप आए तो ख्याले दिले नाशाद आया कितने भुले हुए जखमों का पता याद आया (गुमराह)

2.  संगीतकार रवी प्रारंभी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते?
उत्तर- पोस्ट एन्ड टेलिग्राफ डिपार्टमेंट. 1945-50 पर्यंत दिल्लीत नोकरी केली. नंतर नोकरी सोडून नशीब आजमवायला मुंबईला आले.

3. संगीतकार रवी प्रारंभी कोणत्या संगीतकाराकडे असिस्टंट म्हणून राहिले?
उत्तर- हेमंतकुमार.
4. संगीतकार रवी यांना स्वतंत्र संगीतकार म्हणून कोणता पहिला चित्रपट मिळाला? त्यातले कोणत्या गाण्यांना पॉपुलेरिटी मिळाली होती?
उत्तर- स्वतंत्र संगीतकार म्हणून रवी यांना 'वचन' चित्रपट मिळाला. यातल्या 'चंदा मामा दूर के पुए खिलाए पूर के... आणि 'एक पैसा दे दे बाबू...' गाण्यांना पॉपुलेरिटी मिळाली होती.

5. 'चौदहवी का चांद' या गुरुदत्त यांच्या चित्रपटाचे संगीतकार कोण?
उत्तर- संगीतकार रवी

6. नादिरा हिने कोणकोणत्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केले आहे?
उत्तर- दिलीपकुमार (आन), देवानंद (पॉकेटमार), राजकपूर (श्री 420), अशोककुमार (नगमा) , शम्मीकपूर (सिपहसालर), प्रदीपकुमार (पुलीस), भारतभूषण (ग्यारह हजार लडकीयां)

7. अभिनेत्री नादिरा यांचे मूळ नाव काय?
उत्तर- फरहत एजिकल. ती यहुदी धर्माची होती. मुंबईच्या नागपाडामध्ये राहत होती.

8. फरहत एजिकल या यहुदी तरुणीला नादिरा हे नाव देणारे निर्माते कोण?
उत्तर- महबूब खान.

9. 'मूड मूड के ना देख मूड मूड के ...' हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे आणि कोणावर चित्रित करण्यात आले आहे?
उत्तर- राजकपूर यांच्या श्री 420 चित्रपटातील हे गाणे असून नादिरावर चित्रित करण्यात आले आहे.

10. महात्मा गांधी यांच्या निधनानंतर ' सुनो सुनो ऐ दुनिया वालों बापू की यह अमर कहानी ...' हे गैरफिल्मी गीत कोणी लिहिले?
उत्तर- गीतकार राजेंद्र कृष्ण. त्यांनी 1947 ते 1987 या कालावधीत सुमारे 300 गाणी लिहिली आहेत. 6 जून 1919 रोजी आताच्या पाकिस्तानातील गुजरात नावाच्या जिल्ह्यातल्या जलालपूर गावात जन्म झाला.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या 169 व्या चित्रपटाचं नाव काय?


1.बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या मुलीचे नाव काय?

उत्तर- मसाबा. ती फॅशन डिझायनर आहे. 

2. सुपरस्टार रजनीकांत यांच्या 169 व्या चित्रपटाचं नाव काय?

उत्तर- जेलर. 'जेलर' मध्ये रजनीकांत मुथुवेल पांडियन उर्फ ​​जेलर नावाच्या तुरुंग अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत.  हा चित्रपट एक डार्क कॉमिक थ्रिलर आहे.  या चित्रपटात रजनीकांतशिवाय मल्याळम सुपरस्टार मोहनलाल, कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.  याशिवाय रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी, विनायकन हे देखील चित्रपटात सहाय्यक भूमिकेत आहेत.

3.दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर कोणते पुस्तक लिहिले आहे?

उत्तर- 'हु किल्ड शास्त्री'. विवेक यांनी 'ताशकंत फाईल्स', 'द काश्मीर फाईल्स' आणि 'दिल्ली फाईल्स' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ' ताशकंद फाईल्स' हा चित्रपट लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित होता. याच धर्तीवर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. 'लाल बहादुर शास्त्री मृत्यु या हत्या?' या नावाने हिंदीत अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. 

4. श्रेया घोषाल, शेखर रविजानी, कुणाल गांजावाला, सुगंधा मिश्रा, कमाल खान, राजा हसन, वैशाली माडे आदी गायक मंडळींनी बॉलिवूड मध्ये  चांगले नाव कमावले आहे. त्यांची सुरुवात कोठून झाली?

उत्तर- "झी टीव्हीवरील 'सारे गम प' या कार्यक्रम.

5. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्ग्राहून सुटकेचा थरार अतिशय रंजकपणे पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचे नाव काय? यात शिवाजी महाराज यांची भूमिका कोणी साकारली आहे?

उत्तर- 'शिवप्रताप गरुडझेप'. यात शिवाजी महाराज यांची भूमिका डॉ.अमोल कोल्हे यांनी साकारली आहे.

6. महाराष्ट्राची सून अशी ओळख असणारी अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने कोणत्या चित्रपटाद्वारे मराठी चित्रसृष्टीत पर्दापण केले आहे. 

उत्तर- वेड. या चित्रपटाची निर्मितीदेखील तिनेच केली आहे. या चित्रपटात रितेश देशमुख तिचा नायक आहे. वेड हा मंजिली' या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. 

7. 'पल्याड' या मराठी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कोणत्या जिल्ह्यात झाले आहे?

उत्तर- महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात. शैलेश दुपारे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. स्मशानजोगी समाजातील परिवाराभोवती याची कथा गुंफली आहे.

8. ऋषभ शेट्टी या अभिनेत्याचा एक गाजलेला कन्नड चित्रपट कोणता?

उत्तर- कांतारा. ऋषभ शेट्टी सोबत अभिनेत्री सप्तमी गौडा, किशोर आणि अच्युथ कुमार यांनी काम केले आहे. हा चित्रपट पवित्र प्रथा आणि परंपरा, लपलेला खजिना आणि पिढ्यानपिढ्याचे गुपिते या पारश्वभूम्रीवर आधारित आहे. नंतर हा चित्रपट हिंदी बरोबरच अन्य काही भाषांमध्ये प्रदर्शित झाला. 

9.  दूरदर्शनवरील रामानंद सागर यांच्या सर्वाधिक गाजलेल्या  'रामायण ' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचे नाव काय?

उत्तर- सुनील लहरी.

10. 2022 मध्ये राजश्री प्रोडक्शनने बॉलीवूडमध्ये गौरवशाली 75 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने 2022 मधील मैत्रीवर आधारित 'उंचाई'  नावाचा चित्रपट प्रदर्शित केला होता. या चित्रपटातील कलाकारांची नावे सांगा.

उत्तर- या चित्रपटात अमिताभ बच्चनबरोबरच अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा, डॅनी डेन्ग्झोंपा आणि नफिसा अली सोधी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


पडोसन हा चित्रपट सुनील दत्तची निर्मिती होती की किशोर कुमारची?

 


1.अदि नारायणराव यांनी कोणकोणत्या हिंदी चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलेय? 

उत्तर- सुवर्णसुंदरी व फुलों की सेज या दोनच हिंदी चित्रपटाना त्यांनी संगीत दिलेय. 

2. आज या नावापासून सुरू होणारे किती चित्रपट आतापर्यंत पडद्यावर आलेत? 

उत्तर- आज और कल, आज का दादा, आज का दौर, आज का फरहाद, आज का हिंदुस्तानी, आज का महात्मा, आज का एम. एल. ए., आजकल, आज का यह घर, आज की आवाज, आज की बात, आजकी धारा, आज की दुनिया, आज की रात, आज की ताजा खबर, आजके शोले, आज का गुंडाराज. 

3. मनोजकुमारने दिग्दर्शित  केलेला पहिला चित्रपट कोणता? 

उत्तर- उपकार. 

4. दादा कोंडके व अंजना यांनी कोणत्या चित्रपटात सर्वात प्रथम एकत्र भूमिका केली?

उत्तर- आंधळा मारतो डोळा

5. दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट कोणता?

उत्तर- अभिनेता म्हणून तांबडी माती, निर्माता म्हणून सोंगाड्या आणि दिग्दर्शक म्हणून पांडू हवालदार

6. अशोक सराफ चा पहिला मराठी आणि हिंदी चित्रपट कोणता?

उत्तर- मराठी चित्रपट- दोन्ही घरचा पाहुणा आणि हिंदी चित्रपट- दामाद

7. सचिनचा पहिला मराठी व हिंदी चित्रपट कोणता?

उत्तर- हा माझा मार्ग एकला हा बालकलाकार म्हणून सचिनचा पहिला चित्रपट. जिबो का बेटा हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट. गीत गाता चल या हिंदी चित्रपटात तो सर्वात प्रथम नायक बनला. पारध हा मराठीतला नायक म्हणून त्याचा पहिला चित्रपट. मायबाप या चित्रपटाद्वारा तो मराठीत सर्वात प्रथम दिग्दर्शक बनला. प्रेमदिवाने हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट. 

8. दारा सिंगचा पहिला चित्रपट कोणता? त्याने कोणकोणत्या नायिकांच्याबरोबर भूमिका केल्या? 

उत्तर-  किंग काँग हा दारा सिंगचा पहिला चित्रपट. कुमकुम, निशी, मुमताज, अमिता, जयश्री गडकर, हेलन, परवीन चौधरी, तनुजा, अनिता या चित्रतारकांच्या बरोबर तो नायकाच्या भूमिकेत चमकला. 

9. लीना चंदावरकरचा पहिला चित्रपट कोणता? संजीवकुमारबरोबर ती कोणकोणत्या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत चमकली? 

उत्तर-  मन का मीत हा लीना चंदावरकरचा पहिला चित्रपट. अनहोनी, मनचली, इमान, अपने रंग हजार या चित्रपटात ती संजीवकुमारबरोबर चमकली. 

10. कमाल अमरोही यांचा पहिला चित्रपट कोणता? त्यानी कोणकोणते चित्रपट दिग्दर्शित केले? 

उत्तर-  जेलर हा लेखक म्हणून कमाल अमरोहींचा पहिला चित्रपट. महल हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर दायरा, पाकीजा, रझिया सुलतान हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. 

11. अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीचे नाव काय? तिने कोणकोणत्या चित्रपटात काम केले? जॅकी श्रॉफ नायक बनण्यापूर्वी काय करायचा? 

उत्तर-  जॅकी श्रॉफच्या पत्नीचे नाव आयेशा दत्त. तिने तेरी बाहो में या एकाच चित्रपटात नायिकेची भूमिका केली. जॅकी  नायक बनण्यापूर्की मॉडेलिंग करायचा. 

12. दिग्दर्शक कल्पतरू यांचे खरे नाव काय?

उत्तर-  के परवेज 

13. शबाना आझमी, अनंत नाग व अमोल पालेकर  यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले? 

उत्तर- कनेश्वर रामा 

14. पडोसन हा चित्रपट सुनील दत्तची निर्मिती होती की किशोर कुमारची?

उत्तर- पडोसन हा  मेहमूद चा चित्रपट होता आणि दिग्दर्शन ज्योती स्वरूप यांचे होते. सुनील दत्त, किशोर कुमार यांच्या फक्त भूमिका होत्या.


Thursday, March 2, 2023

देवेन वर्माने कोणकोणत्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या?


1.देवेन वर्माने कोणकोणत्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या? 

उत्तर- फरारी, हा खेळ सावल्यांचा, दोस्त असावा तर असा. 

2.कॉमेडियन कपिल शर्माच्या 'झ्विगाटो' या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे?

उत्तर- कॉमेडियन कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे.  यात कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयची भूमिका केली आहे. या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका शहाना गोस्वामी साकारली आहे.

3.अजय देवगण आणि काजोल यांनी कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे?

उत्तर- अजय आणि काजोल हे दोघे 'गुंडाराज', 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'यू मी और हम' आणि 'राजू चाचा' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. काजोल आणि अजय देवगण शेवटचे 'तानाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटात एकत्र दिसले होते.   

4.मनोज वाजपेयी यांच्या 'गुलमोहर' ( मार्च 2023)च्या या चित्रपटामध्ये कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्रीने काम केले आहे?

उत्तर- बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर. याशिवाय सिमरन आणि अभिनेता सूरज शर्मा यांनी काम केले आहे.

5.शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने कोणता विक्रम केला आहे? 

उत्तर-  शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने ऐतिहासिकरित्या ब्लॉकबस्टर करामत दाखवत वर्ल्डवाइड १०१२ कोटींच्या कलेक्शनसह आजपर्यंत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. 

6. ट्विंकल खन्ना हिने कोणकोणती बेस्ट सेलर पुस्तके लिहिली आहेत? आणि कोणत्या पुस्तकावर पॅडमॅन चित्रपट निघाला?

उत्तर-ट्विंकल खन्ना हिने लिहिलेले  'मिसेस फनीबोन्स' हे पुस्तक 2015 मध्ये देशातील सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले आहे. 'द लिजन्ड ऑफ लक्ष्मीप्रसाद नंतर अलीकडेच तिने 'पैजामाज आर फर्गीव्हिंग' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. 'द लिजन्ड ऑफ लक्ष्मीप्रसाद ' या पुस्तकात ट्विंकलनं छोट्या कथा लिहिल्या आहेत. त्यातली एक कथा अरुणाचलम मुरूगनाथम यांच्यावर आधारित होती. याच कथेच्या आधारावर अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट आला. 

7. मधुबालाची जयन्ती व पुण्यतिथी कोणत्या तारखेला येते? 

उत्तर- १४ फेब्रुवारी १९३३ हा मधुबालेचा जन्मदिन २३ फेब्रुवारी १९६९ हा तिचा मृत्युदिन. 

8. इन्साफ या नावाने सुरू होणारे किती चित्रपट आतापर्यंत पडद्यावर आले आहेत? 

उत्तर- इन्साफ, इन्साफ का मंदिर, इन्साफ का तराजू, इन्साफ कौन करेगा,  इन्साफ की तोफ, इंसाफ की आवाज, इन्साफ मैं करुंगा, इन्साफ की पुकार. 

9.ज्योती या चित्रपटातील “चांद फीर नीकल आया या गाण्यात संजीवकुमार बरोबर असलेली अभिनेत्री कोण? 

उत्तर- निवेदिता. धरती कहे पुकार के या चित्रपटातदेखील ती संजीवकुमारच्या नायिकेच्या भूमिकेत चमकली होती. 

10. अभिनेत्री  सुलोचना महाराष्ट्रीयन आहेत का? 

उत्तर- त्या शंभर टक्के महाराष्ट्रीयन आहेत. मराठी चित्रपटातूनच चित्रपट व्यवसायात त्यांचा उदय झाला आहे आणि प्रपंच, संत गोरा कुंभार या  चित्रपटातील भूमिकांच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारचं सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचं पारितोषिक पटकावलं आहे. 

11. 'पहली तारीख' हा चित्रपट केव्हा पडद्यावर आला होता? या चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण होते? 

उत्तर-  पहली तारीख १९५४ साली पडद्यावर आला होता. निरुपा रॉय,  राजा नेने, आगा, वसंतराव पहेलवान, रमेश कपूर, सुधा आपटे, यशोधरा काटजु, मारुती यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. 


जया बच्चनचा पहिला चित्रपट कोणता? अमिताभ बरोबरचे तिचे चित्रपट कोणकोणते?


 1. संगीतकार नौशाद अली यांनी संगीत दिलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट कोणता?

उत्तर- संगीतकार नौशाद अली यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट ' प्रेमनगर' (1940) आणि शेवटचा चित्रपट 'आवाज दे कहां है' (1990)

2. 1943 सालच्या 'किस्मत' चित्रपटातला लोकांना भरपेट हसवणारा कलाकार कोण?

उत्तर- मेहमूद

3. मेहमूदने किती चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले?

उत्तर- चौदा चित्रपटांची निर्मिती आणि सहा चित्रपटांचं दिग्दर्शन.

4. प्रसिध्द गायक उदित नारायण झा यांची जन्मतारीख आणि जन्म ठिकाण कोणते?

उत्तर- 1 डिसेंबर 1955 आणि जन्मठिकाण बिहार येथील सहरसा. उदित नारायण नेपाळी आहे याची सर्वांना माहिती आहे.

5. 'चोली के पिछे क्या है...' हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे? 

उत्तर- खलनायक. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट.

6. 'सौदागर' (1991) कोणते दोन दिग्गज कलाकार आहेत?

उत्तर- दिलीप कुमार आणि राजकुमार.

7. जया बच्चनचा पहिला चित्रपट कोणता? अमिताभ बरोबरचे तिचे चित्रपट कोणकोणते? 

उत्तर- 'गुड्डी' हा जया बच्चनचा पहिला, चित्रपट, “बन्सी बिरजू , “एक नजर', 'अभिमान' ,  बावर्ची, जंजीर , शोले', मिली’, 'सिलसिला', 'चुपके 'चुपके', 'कभी खुभी कभी गम’, ‘कि अॅण्ड का’  हे तिचे अमिताभ बरोबरचे चित्रपट.

8.परवीन बाबी सध्या कोठे आहे? तिचा पहिला व शेवटचा चित्रपट कोणता? नायक कोण? 

उत्तर- परवीन बॉबी  यांचा जानेवारी 22 , 2005 मध्ये मृत्यू झाला. “चरित्र हा तिचा पहिला चित्रपट. त्यात क्रिकेटपटू सलिम दुररानी तिचा नायक होता. शेवटचा चित्रपट 'आकर्षण' नायक अकबर खान.

9.‘अराउंड द वर्ल्ड’ हा चित्रपट कोणत्या साली प्रदर्शित झाला होता? त्यातील राज कपूरची नायिका कोण? या चित्रपटातील ' अराऊंड द वर्ल्ड! हे गाणे कोणी गायिलंय? 

उत्तर- अराऊंड द वर्ल्ड १९६७ साली प्रदर्शित झाला होता. त्यात राजश्री राज कपूरची नायिका होती, 'अराऊंड द वर्ल्ड हे गाणे मुकेशने व शारदाने गायिलंय. 

10. अमिताभ व हेमा मालिनी यांनी कोणकोणत्या चित्रपटात एकत्र काम केले? त्या दोघांचा हिट  चित्रपट कोणता? फ्लॉप चित्रपट कोणता?

उत्तर-'गहरी चाल’, ‘कसोटी’, 'शोले' , त्रिशूल, 'दो पाप’ , ‘नशीब’, सत्ते पे सत्ता' , 'बागबान' या चित्रपटात ते एकत्र चमकले. यापैकी 'गहरी चाल" मध्ये जितेंद्र हेमाचा नायक होता व अमिताभ या चित्रपटात तिचा भाऊ बनला होता. 'शोले' मध्ये धर्मेंद्र हेमाचा नायक होता तर त्रिशूल मध्ये शशी कपूर. त्या दोघांचा हिट चित्रपट म्हणजे शोले. व फ्लॉप चित्रपट दो और दो पांच.

11. भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता? व पहिला रंगीत सिनेमास्कोप चित्रपट कोणता? 

उत्तर- प्रभातचा सैरंध्री हा भारतातील पहिला रंगीत चित्रपट. व अनुपम पिक्‍चर्सचा प्यार की प्यास’ हा भारतातील पहिला रंगीत सिनेमास्कोप.

12.आत्तापर्यंत आत्महत्या व अपघाताने कोणकोणते कलावंत मृत्यु पावले आहेत?

उत्तर-आत्महत्येने मृत्यु प्रावलेले कलावंत' म्हणजे ज्योती प्रकाश, गुरुदत्त त्यांचे पुत्र तरूण दत्त, दाक्षिणात्य अभिनेत्री शोभा, विजयश्री. सुशांतसिंग रजपूत. अपघाताने मृत्यु पावलेला कलावंत म्हणजे श्याम, फिल्मीस्तानच्या 'शाबीस्तान'’ या चित्रपटाच्या चित्रणाच्या वेळी घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला होता. 

13.अक्षय कुमारचा ‘हॉलिडे’ कोणत्या चित्रपटाचा रिमेक आहे?

उत्तर – थुप्पक्की

अक्षयकुमारचे सलग सहा चित्रपट फ्लॉप


बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अक्षयचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होतात, पण सध्या अक्षयचं स्टारडम संपलं की काय, अशी शंका यायला लागली आहे. सध्या अक्षयच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा हवा तसा  प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 24 फेब्रुवारीला 'सेल्फी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रेक्षकांना खेचून आणण्यात  अपयशी ठरला आहे. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने केवळ 11.9 कोटींची कमाई केली आहे.   2023  या नव्या वर्षातला अक्षय कुमारचा हा पहिलाच चित्रपट असल्याने चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या. पण चित्रपट प्रेक्षकांचे हवे तसे मनोरंजन करू शकलेला नाही. कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटाने  प्रदर्शनाच्या दिवशी 2.6 कोटींपर्यंतची कमाई केली. तर चौथ्या दिवशी चित्रपटाला 1.6 कोटींची कमाई करता आली आहे. यापूर्वीचे अक्षयचे 'बेलबॉटम”, लक्ष्मी”, 'राम सेतू', 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे' व 'सम्राट पृथ्वीराज' हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकलेले नाहीत. आता 'सेल्फी' हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला बॉलीवूडच्या  खिलाडीचा हा सलग सहावा चित्रपट आहे. गेल्यावर्षी 'सम्राट पृथ्वीराज'सारखा बिग बजेट सिनेमादेखील पडद्यावर काहीच कमाल करू शकला नव्हता. अशा या एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमांनंतर अक्षयचे स्टारडम धोक्यात आल्याचे दिसते. आता असं सांगण्यात येत आहे म्हणे की, त्याच्या या घटत्या लोकप्रियतेचा परिणाम त्याच्या मानधनावरही दिसू लागला आहे. त्यामुळे अक्षयने त्याच्या फीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. अक्षयचा आगामी ‘बडे मियां, छोटे मियाँ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, या चित्रपटात अक्षयसोबत टायगर श्रॉफही दिसणार आहे. आता या बिग बजेट चित्रपटाला ब्रेक लागणार अंसल्याचेही दिसत आहे. 

राजीव हरी ओम भाटिया असं खरं नाव असलेल्या अक्षयने व्यावसायिक दृष्टीने अक्षय कुमार हे नाव स्वीकारलं आहे. हा भारतीय वंशाचा कॅनेडियन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. 30 वर्षांच्या अभिनयात  अक्षयकुमारने जवळपास 100 हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून परिचित असलेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. 9 सप्टेंबर1967 अशी जन्मतारीख असलेल्या या अभिनेत्याने आता 56 व्या वर्षात पर्दापण केले आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुरकत्या आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत.नेमाने पहाटे चार वाजता उठून आपल्या कामाला सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याला पुढील काळ कठीण दिसतो आहे. शाहरुख खानचा 'पठाण' सोडला तर गेल्या वर्षभरात बॉलिवूडचा कोणताच अभिनेता हिट झालेला नाही. उलट दक्षिण अभिनेत्यांनी आणि चित्रपटांनी यशाची शिखरे गाठली आहेत. बॉलीवूड अभिनेत्यांच्या त्याच त्याच पठडीतल्या चित्रपटांना प्रेक्षक कंटाळले आहेत. यात अक्षय कुमारचाही समावेश आहे.

सध्याच्या घडीला अक्षय कुमार या आघाडीच्या बॉलीवूडच्या स्टारचे  चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक कोसळत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अक्षय कुमारचे सहा चित्रपट ओळीने फ्लॉप झालेत. यात 'बेलबॉटम”, लक्ष्मी”, 'अतरंगी रे”, 'बच्चन पांडे, 'सम्राट पृथ्वीराज” आणि आता सेल्फी या चित्रपटाची भर पडली. 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाच्या नावामुळे वादही निर्माण झाला होता. चित्रपट निर्मात्यांनी फार खळखळ न करता 'पृथ्वीराज चौहान' या चित्रपटाचे नाव बदलून 'सम्राट पृथ्वीराज' केले. बिग बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मात्र काहीच कमाल दाखवली नाही. 

अक्षय कुमारचा विचार केला तर त्याने केलेल्या सात चित्रपटांपैकी 'सूर्यवंशी' हिट हा एकमेव चित्रपट हिट झाला होता.  मात्र 'सूर्यवंशी"मध्ये अजय देवगण, रणवीर सिंगसारखे यशस्वी आणि कसलेले कलाकारही होते. त्यामुळे या चित्रपटाचे श्रेय एकट्या अक्षय कुमारला देता येणार नाही. 'पृथ्वीराज'च्या भूमिकेत अक्षय कुमारला लोकांनी मूळात स्वीकारले नाही. अलीकडच्या काळात अक्षयने गंभीर भूमिकांपेक्षा विनोदी भूमिकांवर भर दिला आहे. निव्वळ मनोरंजन म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.त्यामुळे या  कॉमेडी अक्षय कुमारची सिरीयस भूमिका लोकांच्या पचनी पडली नाही. याशिवाय अक्षयचे चित्रपट फ्लॉप व्हायला आणखीही काही कारणे आहेत.अक्षय कुमारची 'बच्चन पांडे’ ही फिल्म एका साऊथ सिनेमाची रिमेक होती. यात त्याचा प्रभाव दिसून आला नाही.'पृथ्वीराज ’ ची पटकथा सशक्त तर नव्हतीच, मात्र त्यात अनेक कच्चे दुवेही होते.  प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यासाठी जो वेगळेपणा लागतो, तो या सिनेमांमध्ये नव्हता. किंबहुना हा चित्रपट सामान्य श्रेणीतील होता, असे आपण म्हणू शकतो.  साहजिकच त्याचे स्टारडम संपले की काय अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...