कटरीना कैफ. दिसायला देखणी, भरपूर उंची, अतिशय सुडौल बांधा, नितळ त्वचा, रेशमी केस, ओठांची किंचिंत हालचाल करताच उमलणारं नैसर्गिक हसू, डोळ्यांतील चमक आणि या सगळ्यांसोबत असणारा चेहऱ्यातला एक निरागस गोडवा. त्यामुळे तिचं हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निश्चित झालं. मुळात हिंदी फार न येणाऱ्या आणि अभिनयातही उठावदार कामगिरी नसताना तिनं यश मिळवलं आहे, हे विशेष! आज सतरा वर्षे झाली या इंडस्ट्रीमध्ये येऊन, पण तिचं नाणं अजून खणखणीत चाललं आहे.
Wednesday, June 24, 2020
Saturday, June 20, 2020
कपूर आडनावाची मराठी श्रद्धा
श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची कन्या. अप्सरेला लाजवेल असं काही तिचं सौंदर्य नाही. शिवाय तिच्याकडे असामान्य अभिनय क्षमता असल्याचा अजून साक्षात्कार झालेला नाही. तिच्या नावावर अजूनही एकसुद्धा 'सोलो हिट' ची नोंद नाही. असं असलं तरी तिच्या मोठ्या बॅनरमध्ये वावर आहे. हीच तिची जमेची बाजू. शिवाय जाहिरातींमध्येही ती सतत झळकत असते. या हिंदी सिनेमा सृष्टीत येऊन तिला दहा वर्षे झाली आहेत.
Friday, June 19, 2020
टीकेला बगल देऊन वाटचाल करणारी आलिया
आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईत सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या घरी झाला. भट्ट खानदान सिनेमा सृष्टीतलं मोठं प्रस्थ आहे. वडिलांबरोबरच आई सोनी राझदान अभिनेत्री, काका मुकेश भट्ट निर्माता, दुसरा काका रॉबिन भट्ट लेखक, सावत्र बहीण पूजा भट्ट अभिनेत्री,इमरान हाश्मी अभिनेता आणि मोहित सूरी दिग्दर्शक यांसारखे नातेवाईक... सिनेमा सृष्टीच्या कोणत्याही दिशेला जा. कोणी ना कोणी आहेच. अशा फिल्मी वातावरणात अगदी लाडाने वाढलेली आलिया. पण ती फक्त शोभेची बाहुली अजिबात नाही. तिनं आपण अभिनेत्री आहोत,हे दाखवून दिलंय.
Thursday, June 18, 2020
'क्लबची राणी' दीपिका
उंच अभिनेत्रींना हिंदी चित्रपट सृष्टीत यश मिळत नाही,हा समज दीपिका पादुकोन हिने खोटा ठरवला. आपल्या जिवंत अभिनय, सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीमुळं तिला यश मिळालं आहे, हे नाकारता येत नाही. आजच्या घडीला ती आघाडीची नायिका आहे. भूमिका कुठलीही असो, आपल्या अभिनय क्षमतेने ती भूमिका ती सहज निभावत असल्याने निर्माता-दिग्दर्शक यांची तिच्या नावाला पहिली पसंदी असते. कमाईमध्येदेखील ती सगळ्यांच्या पुढे आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटानं दीपिका हिंदी चित्रपट सृष्टीतील 'रिअल क्वीन' असल्याचं म्हटलं जातं आहे. तिचे आतापर्यंत सात चित्रपट100 कोटी क्लबमध्ये दाखल झाले आहेत. 'चेन्नई एक्सप्रेस', 'रेस3', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'ये जवानी है, दिवानी', 'हॅपी न्यू इअर', हे चित्रपट100 कोटी क्लबमध्ये याआधीच दाखल झाले आहेत.
Monday, June 15, 2020
'लकी चार्म' सोनाक्षी सिन्हा
एसएनडीटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यावर तिला या विषयाची इतकी गोडी लागली की तिने याच क्षेत्रात झोकून द्यायचं पक्कं केलं. काही फॅशन ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला. 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझायनर झाली. या क्षेत्रात वावरत असताना अचानक तिला अरबाज खान भेटला. त्यांना 'दबंग'साठी नायिका हवी होती. आणि सोनाक्षी सिन्हा मध्ये त्याला अपेक्षित नायिका सापडली. मात्र याच सोनाक्षी सिन्हाला चित्रपटात यायसाठी तब्बल तीस किलो वजन कमी करावं लागलं. पण ते सिन्हा नं केलं. चित्रपट हिट झाला आणि सोनाक्षीचं नाणं चाललं.
Sunday, June 14, 2020
तेरे मस्त मस्त दो नैन...
डोळे अंतःकरणाचे आरसे आहेत म्हणून डोळे ओठांपेक्षा जास्त बोलतात. जेव्हा प्रेमाची गोष्ट येते तेव्हा डोळे हृदयाचे शब्द होतात, म्हणूनच बॉलिवूड चित्रपटात डोळ्यांच्या सौंदर्यावर बरीच गाणी बनली आहेत. रोमॅंटिक चित्रपट असो अथवा मारधाड असलेला चित्रपट. विनोदी असो अथवा सस्पेन्स सगळ्या चित्रपटांमध्ये नायक-नायिका यांची भेट होते, नजरानजर होते. दोघे डोळ्यांनी बोलतात. हा सगळा नायक-नायिकेच्या प्रेमाचा खेळ असतो. त्याच्याशिवाय आपला हिंदी चित्रपट कधी पूर्णच होत नाही. प्रचंड रक्तपातानं बरबटलेले कुठलेही 'हिंसापट' काढा- तीन तासांच्या हाणामारीत पाच मिनिटांसाठी का होईना, पण मधूनच नायिका अवतरते.
कथ्थक नृत्यांगना, अभिनेत्री: सितारादेवी
वाजपेयी सरकारने पद्मभूषण किताब जाहीर केला, तेव्हा 'भारतरत्न'पेक्षा खालचा किताब आपल्याला जाहीर करणे हा आपला अपमान आहे, असे सांगून सीतारादेवी यांनी तो परत केला.कथ्थकची प्रतिभाशाली नर्तकी म्हणून प्रसिद्ध राहिलेल्या सितारादेवी यांनी हिंदी चित्रपटांच्या एका जमान्यावर नायिका, खलनायिका व सहनायिका म्हणून आपला ठसा उमटवला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी 'नृत्यसम्राज्ञी' हा किताब उत्स्फूर्तपणे दिला होता. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी कलकत्त्यात झाला. त्यांचे नाव धनलक्ष्मी, पण धन्नो म्हणूनच त्यांना ओळखीत.
Subscribe to:
Posts (Atom)
यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास
बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...
-
बॉलिवूडचं 'सावन का महिना' आणि 'पाऊस' यांच्याशी खास असं मधुर नातं आहे. चित्रपट निर्माणकर्त्यांनी पडद्यावर श्रावणछटा, पावस...
-
सुनील दत्त एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि राजकारणी होते. त्यांचा जन्म अविभाजित पंजाबच्या झेलम जिल्ह्यात 6 जून 1929 रोजी झाला होता. त्या...
-
बड्या निर्मात्यांना त्यांचा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली आहे,तरीही अजून चित्रपट प्रदर्शित करण...





