Wednesday, June 24, 2020

सौंदर्यवती कटरीना

कटरीना कैफ. दिसायला देखणी, भरपूर उंची, अतिशय सुडौल बांधा, नितळ त्वचा, रेशमी केस, ओठांची किंचिंत हालचाल करताच उमलणारं नैसर्गिक हसू, डोळ्यांतील चमक आणि या सगळ्यांसोबत असणारा चेहऱ्यातला एक निरागस गोडवा. त्यामुळे तिचं हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निश्चित झालं. मुळात हिंदी फार न येणाऱ्या आणि अभिनयातही उठावदार कामगिरी नसताना तिनं यश मिळवलं आहे, हे विशेष! आज सतरा वर्षे झाली या इंडस्ट्रीमध्ये येऊन, पण तिचं नाणं अजून खणखणीत चाललं आहे.

Saturday, June 20, 2020

कपूर आडनावाची मराठी श्रद्धा

श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची कन्या. अप्सरेला लाजवेल असं काही तिचं सौंदर्य नाही. शिवाय तिच्याकडे असामान्य अभिनय क्षमता असल्याचा अजून साक्षात्कार झालेला नाही. तिच्या नावावर अजूनही एकसुद्धा 'सोलो हिट' ची नोंद नाही. असं असलं तरी तिच्या मोठ्या बॅनरमध्ये वावर आहे. हीच तिची जमेची बाजू. शिवाय जाहिरातींमध्येही ती सतत झळकत असते. या हिंदी सिनेमा सृष्टीत येऊन तिला दहा वर्षे झाली आहेत.

Friday, June 19, 2020

टीकेला बगल देऊन वाटचाल करणारी आलिया

आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईत सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या घरी झाला. भट्ट खानदान सिनेमा सृष्टीतलं मोठं प्रस्थ आहे. वडिलांबरोबरच आई सोनी राझदान अभिनेत्री, काका मुकेश भट्ट निर्माता, दुसरा काका रॉबिन भट्ट लेखक, सावत्र बहीण पूजा भट्ट अभिनेत्री,इमरान हाश्मी अभिनेता आणि मोहित सूरी दिग्दर्शक यांसारखे नातेवाईक... सिनेमा सृष्टीच्या कोणत्याही दिशेला जा. कोणी ना कोणी आहेच. अशा फिल्मी वातावरणात अगदी लाडाने वाढलेली आलिया. पण ती फक्त शोभेची बाहुली अजिबात नाही. तिनं आपण अभिनेत्री आहोत,हे दाखवून दिलंय.

Thursday, June 18, 2020

'क्लबची राणी' दीपिका

उंच अभिनेत्रींना हिंदी चित्रपट सृष्टीत यश मिळत नाही,हा समज दीपिका पादुकोन हिने खोटा ठरवला. आपल्या जिवंत अभिनय, सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीमुळं तिला यश मिळालं आहे, हे नाकारता येत नाही. आजच्या घडीला ती आघाडीची नायिका आहे. भूमिका कुठलीही असो, आपल्या अभिनय क्षमतेने ती भूमिका ती सहज निभावत असल्याने निर्माता-दिग्दर्शक यांची तिच्या नावाला पहिली पसंदी असते. कमाईमध्येदेखील ती सगळ्यांच्या पुढे आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटानं दीपिका हिंदी चित्रपट सृष्टीतील 'रिअल क्वीन' असल्याचं म्हटलं जातं आहे. तिचे आतापर्यंत सात चित्रपट100 कोटी क्लबमध्ये दाखल झाले आहेत. 'चेन्नई एक्सप्रेस', 'रेस3', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'ये जवानी है, दिवानी', 'हॅपी न्यू इअर', हे चित्रपट100 कोटी क्लबमध्ये याआधीच दाखल झाले आहेत.

Monday, June 15, 2020

'लकी चार्म' सोनाक्षी सिन्हा

एसएनडीटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यावर तिला या विषयाची इतकी गोडी लागली की तिने याच क्षेत्रात झोकून द्यायचं पक्कं केलं. काही फॅशन ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला. 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझायनर झाली. या क्षेत्रात वावरत असताना अचानक तिला अरबाज खान भेटला. त्यांना 'दबंग'साठी नायिका हवी होती. आणि सोनाक्षी सिन्हा मध्ये त्याला अपेक्षित नायिका सापडली. मात्र याच सोनाक्षी सिन्हाला चित्रपटात यायसाठी तब्बल तीस किलो वजन कमी करावं लागलं. पण ते सिन्हा नं केलं. चित्रपट हिट झाला आणि सोनाक्षीचं नाणं चाललं.

Sunday, June 14, 2020

तेरे मस्त मस्त दो नैन...

डोळे अंतःकरणाचे आरसे आहेत म्हणून डोळे ओठांपेक्षा जास्त बोलतात.  जेव्हा प्रेमाची गोष्ट येते तेव्हा डोळे हृदयाचे शब्द होतात, म्हणूनच बॉलिवूड चित्रपटात डोळ्यांच्या सौंदर्यावर बरीच गाणी बनली आहेत. रोमॅंटिक चित्रपट असो अथवा मारधाड असलेला चित्रपट. विनोदी असो अथवा सस्पेन्स सगळ्या चित्रपटांमध्ये नायक-नायिका यांची भेट होते, नजरानजर होते. दोघे डोळ्यांनी बोलतात.  हा सगळा नायक-नायिकेच्या प्रेमाचा खेळ असतो. त्याच्याशिवाय आपला हिंदी चित्रपट कधी पूर्णच होत नाही. प्रचंड रक्तपातानं बरबटलेले कुठलेही 'हिंसापट' काढा- तीन तासांच्या हाणामारीत पाच मिनिटांसाठी का होईना, पण मधूनच नायिका अवतरते.

कथ्थक नृत्यांगना, अभिनेत्री: सितारादेवी

वाजपेयी सरकारने पद्मभूषण किताब जाहीर केला, तेव्हा 'भारतरत्न'पेक्षा खालचा किताब आपल्याला जाहीर करणे हा आपला अपमान आहे, असे सांगून सीतारादेवी यांनी तो परत केला.कथ्थकची प्रतिभाशाली नर्तकी म्हणून प्रसिद्ध राहिलेल्या सितारादेवी यांनी हिंदी चित्रपटांच्या एका जमान्यावर नायिका, खलनायिका व सहनायिका म्हणून आपला ठसा उमटवला होता.  वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी 'नृत्यसम्राज्ञी' हा किताब उत्स्फूर्तपणे दिला होता. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी कलकत्त्यात झाला. त्यांचे नाव धनलक्ष्मी, पण धन्नो म्हणूनच त्यांना ओळखीत.

चोखंदळ अभिनेत्री:राधिका आपटे

राधिका आपटे ही एक बिनधास्त आणि सडेतोड स्वभावाची आहे. तिचे विचार बोल्ड आहेत,पण तितकीच सशक्त अभिनेत्री आहे. 'हंटर' आणि 'बदलापूर...' च्या यशानंतर ती मेनस्ट्रीम मधली नायिका म्हणून ओळखली जाऊ लागली.  'पॅडमॅन'सारख्या चित्रपटात राधिकानं जे काम केलं आहे,त्यामुळे तिची स्वतःची स्वतंत्र ओळख प्रस्थापित झाली आहे. मात्र तिच्या अभिनयापेक्षा तिच्या अन्य गोष्टींमुळेच अधिक ती चर्चेत राहिली आहे.

Saturday, June 13, 2020

बोलपटाची पहिली तारका जुबैदा

भारतीय सिनेमाचा एक स्तंभ असलेल्या जुबैदाचे नाव आजच्या पिढीला ठाऊकही नसेल. भारतीय सिनेमासृष्टीचा पहिला बोलपट 'आलमआरा'. या चित्रपटातील जुबैदा ही पहिली नायिका होती. आज कटरीना कैफ, प्रियांका चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस सारख्या रूपवतीप्रमाणेच जुबैदादेखील त्याकाळातील 'मल्लिका' होती. काही निवडक कलाकारांमध्ये तिचं नाव घेतलं जायचं. मूकपट ते बोलपट असा तिचा यशस्वी सिने प्रवास राहिला आहे.जुबैदा ही 1910 मध्ये एका नवाब घराण्यात जन्मली होती. तिची अम्मी बेगम फातिमा त्या काळात जेव्हा चित्रपटात काम करणं म्हणजे घाणेरडं काम म्हटलं जातं होतं, तेव्हा फातिमा यांनी सगळ्या सीमा ओलांडून अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात उतरल्या होत्या.

वेगळं करण्यासाठी धडपडणारी विद्या बालन

1995 मध्ये झी वाहिनीवरून 'हम पांच' नावाची एक विनोदी मालिका प्रसारित होत होती. यात बहिऱ्या आणि जाड भिंगाचा चष्मा आणि ढगळ कपडे घालणाऱ्या तिसऱ्या बहिणीची भूमिका विद्या बालनने केली होती. पाचजणींमध्ये यथातथाच दिसणारी, अजिबात ग्लॅमरस नसणारी व्यक्तिरेखा तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच साकारली होती. ही मालिका प्रचंड गाजली. यातल्या सर्वच व्यक्तिरेखा घराघरात पोहचल्या. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की, व्यक्तिरेखा कुठलीही असली तरी आपल्या व्यक्तिमत्त्वात ती व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता आहे, असा विश्वास विद्याच्या ठायी होता,हे महत्त्वाचे. त्यामुळेच ती विविध छटेच्या भूमिका करूनही ती प्रत्येक वेळी नव्या रुपात चाहत्यांसमोर येते. वेगळ्या रुपात आधीच्या भूमिकेची छाप तिच्यावर नसते.

प्रगल्भ राणी मुखर्जी

घोगऱ्या आवाजाची, सावळ्या रंगाची, विशेष उंची नसलेली, साधारण देहयष्टीची राणी मुखर्जी 1992 मध्ये चित्रपट सृष्टीत अवतरली. वडील राम मुखर्जी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आणि आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका. त्यामुळे राणी लहानपणापासूनच चित्रपटाच्या वातावरणात वाढलेली.
तिला चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. तिच्या खडतर मेहनतीने आणि सहज अभिनयाच्या मदतीने तिने काही काळ आपलं स्वतःच स्थान निर्माण केलं होतं. तिचा पहिला चित्रपट 'राजा की आएगी बारात' सपशेल आपटला. पण तिच्या कामाचं कौतुक झालं. राणीच्या कारकिर्दीतला पहिला लोकप्रिय चित्रपट म्हणजे 'गुलाम' (1998) या चित्रपटातील 'आती क्या खंडाला' हे गाणं जबरदस्त हिट ठरलं. यामुळे राणी 'खंडाला गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली.

Thursday, June 11, 2020

रुपेरी पडद्यावरील ओलिचिंब पाऊसगाणी... बरसो रे मेघा...

बॉलिवूडचं 'सावन का महिना' आणि 'पाऊस' यांच्याशी खास असं मधुर नातं आहे. चित्रपट निर्माणकर्त्यांनी पडद्यावर  श्रावणछटा, पावसाची रिमझिम आणि पावसात मनसोक्त भिजणाऱ्या नायक-नायिका यांचं लोभस चित्रण अनेकदा रेखाटलं आहे. ढगांचा कडकडाट, विजेचा चमचमाट आणि टपकणारे पावसाचे थेंब जेव्हा संगीताच्या साथीनं पडद्यावर खेळू लागतात तेव्हा चित्रपटगृहात सीटवर बसलेला प्रेक्षक ते पाहताना तन-मनानं त्यात सामील होतो. श्रावण आणि पाऊस याविषयी गाण्यांचा सिलसिला चित्रपटांमध्ये सुरुवातीपासूनच चालू आहे. रोमान्स असो अथवा वियोग, शरारत असो अथवा रूसवा-फुगवा या संवेदना चित्रपटांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खुबीने पडद्यावर साकारली आहे.

Wednesday, June 10, 2020

अभिनयकुशल अभिनेत्री

शरीरसौंदर्य काळाच्या ओघात वितळून जातं परंतु जन्मजात संवेदनशीलतेने अवतीभोवतीच्या जगण्यातून कमावलेला आशय आणि त्यातून घडलेलं व्यक्तिमत्त्व मात्र कायम टिकून राहातं. जातिवंत कलावंताचा अभिनय हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गाभा असतो. शारीर सौंदर्य आणि यश-अपयश याच्या पलीकडे जाऊन काही कलावंत आपल्या कायम स्मरणात राहतात. ते त्यांच्या अभिनयामुळेच! आपल्या भारतीय चित्रपटात अशा कलावंतांची संख्या कमी नाही. मूकपटापेक्षा बोलपट युगात अभिनेत्रींनचा प्रभाव भारतीय चित्रपटात विशेषत्वाने दिसून आला. बोलपटाचं पहिलं दशक सर्वसाधारणपणे दुर्गा खोटे, देविका राणी आणि लीला चिटणीस यांनी व्यापलं होतं.

Tuesday, June 9, 2020

अभिनेत्री डिंपल कापडिया

डिंपल कापडिया यांचा जन्म 8 जून 1957 रोजी मुंबईत झाला.त्यांचे वडिल चुन्नीभाई कपाडिया एक धनाढ्य व्यक्ती होते. चुन्नीभाई आपल्या 'समुद्र महल' या घरात मोठमोठ्या पार्ट्या द्यायचे. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सचा राबता असायचा. अशाच एका पार्टीत राजकुमार यांची नजर १३ वर्षांच्या डिंपलवर पडली. राजकुमार यांनी डिंपलला घेऊन चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली. चुन्नीभाईंनी काही वेळ मागून घेतला. अखेर तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी आणि १९७३ मध्ये राज कूपर यांच्या 'बॉबी' या चित्रपटात डिंपल झळकली.

मराठी अभिनेता गश्मीर महाजनी

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता म्हणून गश्मीर महाजनी ओळखला जातो. गश्मीर महाजनीचे वडील म्हणजे जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी होय. गश्मीर याचा जन्म 8 जून 19985 रोजी झाला. त्याचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. गश्मीर महाजनी कॉलेजमध्ये असताना स्टेट लेव्हलला टेनिस आणि नॅशनल लेव्हलला बास्केटबॉल खेळला आहे. एथेलेटिक्सचीही त्याला आवड होती. क्रिकेटही खूप खेळला आहे. रविंद्र महाजनीच्या मुळे त्याला व्यायामाची आवड लागली. तीन वर्षांचा असताना तो त्यांच्यासोबत जीममध्ये जात असे.

आरोग्याचा मंत्र देणारी शिल्पा

शिल्पा शेट्टीचा जन्म 8 जून 1975 चा आहे. अभिनेत्री राहिलेली शिल्पा शेट्टी योग अभ्यासक आहेच त्याच बरोबरच एक यशस्वी बिझनेस वूमन म्हणून आपल्याला परिचित आहे. शिल्पाने सेंट एन्थोनी हाईस्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर पोद्दार कॉलेज माटुंगा मधून आपले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानी भारतीय क्लासिकल डान्स प्रकार भरत नाट्यम मध्ये निपुणता मिळवली आहे. शालेय काळात ती त्यांच्या व्हॉलीबॉल टीमची कप्तान सुद्धा होती. त्यांनी कराटे मध्ये ब्ल्याक बेल्ट मिळविला आहे. १९९१ मध्ये १० वी ची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी मॉडेलच्या रुपात आपल्या करियर ची सुरुवात केली होती.

Thursday, June 4, 2020

अशोक सराफ आणि निवेदिता जोशी

सर्वांचे आवडते अशोक मामा उर्फ प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ म्हणजे पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे, प्रेक्षकांना खळखळून हसवणारे नायक. पण अशोक सराफ खर्‍या आयुष्यात अतिशय शांत स्वभावाचे आहेत, हे वाचून आश्यर्च वाटेल. ४ जून १९४७ रोजी मुंबईत अशोक सराफ यांचा जन्म झाला. अभिनेत्री निवेदिता जोशी या अशोक सराफ यांच्या पत्नी. प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. अशोक सराफ व निवेदिता यांच्याबाबतीत असेच म्हणता येईल. कारण अशोक सराफ हे पत्नी निवेदिता यांच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठे आहेत.

Monday, June 1, 2020

दमदार अभिनेता परेश रावल

हिंदी चित्रपटसृष्टी व गुजराती रंगभूमी वरील एक मोठे नाव म्हणजे परेश रावल. आपल्या दमदार अभिनयाने गेल्या तीन दशकांपासून या माणसाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. परेश रावल यांना बॉलिवूड मध्ये म्हणून ओळखले जाते. रावल यांनी चित्रपट, रंगभूमी व दूरदर्शन या तीनही माध्यमातून भूमिका साकारली आहे. परेश रावल यांचे बालपण विलेपार्ले येथे गेले. ते दहा -अकरा वर्षाचे असताना कुतूहल म्हणून नवीनभाई ठक्कर ओपन थिएटर मध्ये जाऊ लागले, तेथूनच
त्यांना गुजराती नाटकाची आवड लागली. त्या सोबतच परेश रावल यांचे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न होते. २२ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधू लागले आणि सिव्हील इंजिनिअरींगमध्ये करीयर करण्यासाठी संघर्ष करु लागले.

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...