Friday, May 29, 2020
Monday, May 25, 2020
टीव्ही अभिनेत्रींच्या कमाईबद्दल जाणून घ्या
टीव्ही कलाकारांची लोकप्रियता बॉलिवूड स्टार्सपेक्षा कमी नाही. आताच्या घडीला टेलिव्हिजनने आणि त्यातल्या कलाकारांनी देखील आपल्या दर्शकांच्या हृदयात मोठ्या स्क्रीनसारखे स्थान निर्माण केले आहे. छोट्या पडद्यावर काम करणारे सितारे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, यात शंका नाही. छोट्या पडद्यावरील सर्व अभिनेत्री अभिनयाच्या बाबतीत मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रींशी स्पर्धा करतात, कमाईच्या बाबतीत ते फारसे मागे नाहीत.
Thursday, May 21, 2020
सर्वात श्रीमंत बॉलिवूड अभिनेत्री कोण?
बॉलिवूड अभिनेत्री एखाद्या चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये घेत असतात शिवाय जाहिराती, शो इत्यादी कार्यक्रमांमधून पैसेही कमवतात. आपल्याला माहितच आहे की बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्री खूप श्रीमंत आहेत, परंतु या नायिकांपैकी सर्वात श्रीमंत कोणीतरी एकटीच असणार ना? वर्ल्डटॉपस्ट वेबसाइटनुसार बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींची यादी आली आहे. त्यावर थोडी नजर टाकू या
Tuesday, May 19, 2020
बोलक्या डोळ्यांची श्यामा
हिदी रूपेरी पडद्यावर तिचा प्रवेश अचानक झाला.ती आपल्या बहिणींसोबत चित्रपटाचे चित्रिकरण पाहण्यास गेली होती. नूरजहाँ अभिनीत 'जिनत' चित्रपटातील 'आहे न भरी शिकवे न किए कुछ भी न जुबाँ से काम लिया...' या गाजलेल्या कव्वालीचं चित्रिकरण सुरू होते. यात शशिकला, शालिनी व काही मुलींचा सहभाग होता. कव्वालीसाठी तिच्या दोन्ही बहिणींची निवड झाली होती. त्यांच्यासोबत तीहि आली होती. या दरम्यान शौकत हुसेन यांची तिच्यावर नजर पडली आणि या बोलक्या डोळ्यांच्या मुलीला त्यांनी चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. तिनहि आवेवेढे न घेता पटकन् होकार दिला... ती म्हणजे श्यामा!
Monday, May 18, 2020
'वो भुली दास्तां... ' नलिनी जयवंत
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या कुटुंबांकडून, खास करून मुलीच्या घरच्यांकडून मुलींना या क्षेत्रात यायला कडाडून विरोध होता म्हणजे पाबंदीच होती. असे असतानाही त्याकाळात दुर्गा खोटे, लीला चिटणीस, शोभना समर्थ, वनमाला अशी शांता आपटे सारख्या अनेक अभिनेत्रींनी सगळ्या सामाजिक, कौटुंबिक विरोधाची पर्वा न करता सिनेमामध्येच आपले करिअर शोधले. यात एक नामवंत नलिनी जयवंत हिचाही समावेश आहे.
'ड्रीम गर्ल' हेमामालिनी यांना असा मिळाला,'सपनों का सौदागर'
हेमामालिनी यांच्याबाबतीत बऱ्याच लोकांना असं वाटतं की, शोमन राजकपूरने 'सपनों का सौदागर' या चित्रपटातून हेमामालिनीला हिंदी सिनेमात ब्रेक दिला. पण सत्य मात्र वेगळंच आहे. राज कपूरने तिला ब्रेक दिला नव्हता, कारण तो एक फक्त हिरो होता. या चित्रपटाचे निर्माता होते अनंत स्वामी, ज्यांनी एका साऊथच्या मुलीला म्हणजे हेमामालिनीला चित्रपटात घेऊन धोका पत्करला होता. ही गोष्ट स्वतः हेमामालिनीने एकदा बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
नृत्यकुशल, अभिनयनिपुण अभिनेत्री: वैजयंतीमाला
दाक्षिणात्य नायिकांमध्ये एक महत्त्वाचे अंग होते. वैजयंती मालादेखील त्याला अपवाद नव्हती. तामिळ चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या अभिनय निपुण,सुस्वरूप आणि गोड चेहऱ्याच्या नायिकेने 1952 च्या सुमारास चेन्नई (तेव्हाचे मद्रास) मध्येच तयार झालेल्या 'बहार' या हिंदी चित्रपटाद्वारे नाचतच पदार्पण केले. आणि यथावकाश तिने अभिनयाचे ,लोकप्रियतेचे आणि कर्तृत्वाचे शिखर गाठले. सुरुवातीला तिने सुरेश (यास्मिन), प्रदीप कुमार (एक शोला/ जवानी की हवा), किशोर कुमार (पहली झलक), नागेश्वरराव (देवता) असे फारसे प्रसिद्ध नायक नसलेले चित्रपटही स्वीकारले.
Sunday, May 17, 2020
अभिनेता सलीम खान
स्टार रायटर जोडी सलीम-जावेद यातील एक पार्टनर सलीम खानला जुनी आणि नवी पिढी चांगलीच ओळखते. पण अभिनेता सलीम म्हणून नव्या पिढीला तो अजिबात परिचित नाही. खूपच कमी लोकांना माहीत असेल की, सलीमने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ऍक्टर म्हणून केली आहे. जुन्या काळातील जानेमाने चित्रपटकर्ते के.अमरनाथ यांनी सलीमचा फोटोजेनिक फेस आणि लुक पाहून खूप प्रभावित झाले होते. त्यांनी चारशे रुपये महिना मेहनताना ठरवून सलीम याला आपल्या चित्रपटाशी साइन केले. त्यांनी त्यांच्या पहिल्या 'काबुली खान' मध्ये पहिला ब्रेक दिला. याच्या टायटल रोलमध्ये अजीत होता आणि त्याची हिरोईन होती हेलन. 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलीमने अजितच्या भावाची भूमिका केली होती.
गुलाम मुहम्मद आणि पाकिजा
'युं ही कोई मिल गया था...'
कमाल अमरोही यांच्या'पाकिजा' या क्लासिक चित्रपटाचा काही निवडक म्युझिकल चित्रपटांमध्ये समावेश होतो. या चित्रपटात सुरांची कमाल दाखवली होती संगीतकार गुलाम मुहम्मद यांनी! पण दुर्दैव असे की त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात यशस्वी आणि प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या या चित्रपटाचे यश पाहण्याअगोदरच त्यांचे निधन झाले. गुलाम मुहम्मद यांनी 'पाकिजा' चित्रपटातील प्रत्येक गाण्यांसाठी मोठी मेहनत घेतली होती. आठवा- 'युं ही कोई मिल गया था सरे राह चलते चलते...' मीनाकुमारीचे गुलाबी पाय, राजकुमार यांचे दमदार संवाद, लताचा दिलकश आवाज आणि कैफ भोपाली यांचे जादुई 'अल्फाज' याने सगळे वेडे होऊन जातात.
कमाल अमरोही यांच्या'पाकिजा' या क्लासिक चित्रपटाचा काही निवडक म्युझिकल चित्रपटांमध्ये समावेश होतो. या चित्रपटात सुरांची कमाल दाखवली होती संगीतकार गुलाम मुहम्मद यांनी! पण दुर्दैव असे की त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात यशस्वी आणि प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या या चित्रपटाचे यश पाहण्याअगोदरच त्यांचे निधन झाले. गुलाम मुहम्मद यांनी 'पाकिजा' चित्रपटातील प्रत्येक गाण्यांसाठी मोठी मेहनत घेतली होती. आठवा- 'युं ही कोई मिल गया था सरे राह चलते चलते...' मीनाकुमारीचे गुलाबी पाय, राजकुमार यांचे दमदार संवाद, लताचा दिलकश आवाज आणि कैफ भोपाली यांचे जादुई 'अल्फाज' याने सगळे वेडे होऊन जातात.
Saturday, May 16, 2020
अनुपम संगीताचा बादशहा:खेमचंद प्रकाश
सर्वसामान्यांना 'महल' या चित्रपटासाठी आठवणीत असलेल्या खेमचंद प्रकाश यांचा जन्म राजस्थानमध्ये 1903 च्या सुमारास झाला. त्यांचं कुटुंब सुजानगढजवळच्या गावातलं. वडील पं. गोवर्धन प्रसाद जयपूरच्या महाराजांच्या सेवेत होते. खेमचंद यांनी तिसच्या दशकाच्या मध्यास चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं अन 1939 साली 'गाझी सलाहुद्दीन' या चित्रपटाला सर्वप्रथम संगीत दिलं. पुढच्या वर्षी ते रणजीत मुव्हीटोन या संस्थेत दाखल झाले. खेमचंद प्रकाश यांनी आपल्या कारकिर्दीत एकंदर 35 ते 40 चित्रपटांना संगीत दिलं. त्यातले किमान 15 चित्रपट रणजीत मुव्हीटोन चे होते.
भाग्यश्री करणार कमबॅक
मैंने प्यार किया या पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री सुमारे दशकभरानंतर पुन्हा एकदा फिल्मी दुनियेत परतणार आहे. एकेकाळी भाग्यश्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते, पण अचानक ही भाग्यश्री बॉलिवूडमधून गायब झाली होती. २0१0 मध्ये प्रदर्शित झालेल्या रेड अलर्ट - द वॉर विदिन या सिनेमात ती अखेरची दिसली होती. तेव्हापासून सलमानच्या सुमनला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक होते. पण तसे काहीही झाले नाही. भाग्यश्रीने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न त्यामुळे चाहत्यांच्या मनात कायमचा रूतून बसला होता. पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळालेय. होय, इतक्या वर्षांनंतर खुद्द भाग्यश्रीने याचा खुलासा केला आहे.
सुनील दत्त आणि त्यांची सुमधूर गाणी
सुनील दत्त एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि राजकारणी होते. त्यांचा जन्म अविभाजित पंजाबच्या झेलम जिल्ह्यात 6 जून 1929 रोजी झाला होता. त्यांचे शिक्षण मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात झाले. त्यांनी रेडिओ सिलोनमध्ये उद्घोषक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. रेडिओ सिलोन हे दक्षिण आशियातील सर्वात जुने रेडिओ स्टेशन आहे. उद्घोषक म्हणून दत्त साहेब खूप लोकप्रिय झाले. त्यांना अभिनयात खूप रस होता. आणि या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटविला.
Friday, May 15, 2020
बिना रॉय: एक तेजस्वी तारका
1950 च्या दशकात रुपेरी पडद्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं बिना रॉय! हिचा जन्म 4 जानेवारी 1931 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला. 1960 चे दशकसुद्धा या रूप सुंदरीने आपल्या सौंदर्याच्या बळावर रुपेरी पडदा गाजवला. 'काली घटा' या चित्रपटातून बिना रॉय प्रेमनाथ, किशोर साहू यांच्याबरोबर पडद्यावर झळकली. 1953 मध्ये नंदलाल जसवंतलाल यांचा 'अनारकली' आला आणि त्या चित्रपटाने बिना रॉय घराघरांत पोहचली. सलीम-अनारकली यांची ही अमर प्रीतिकथा पडद्यावर प्रदीप कुमार आणि बिना रॉय यांनी अजरामर करून सोडली.
Thursday, May 14, 2020
हुमांशू रॉय आणि बॉम्बे टॉकीज
बॉम्बे टॉकीजने अशोक कुमार, देविका राणी, दिलीप कुमार अशा कलाकारांना चित्रपटसृष्टीत आणले. लता मंगेशकर यांनी 'महल' चित्रपटाद्वारे यशाची चव चाखली. 'बसंत' (1942) मध्ये पहिल्यांदा मधुबाला कॅमेर्यासमोर उभी राहिली. 'जिददी' ने देव आनंदला चित्रपटसृष्टी स्थिरता लाभली. आणि राज कपूरची सुरुवात क्लॅपर बॉयने झाली. बॉम्बे टॉकीजला बर्याच कलाकार आणि अनेक यशस्वी चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म कंपनी बनवण्याचे स्वप्न पाहणारे जिन हिमांशू राय यांनी पाहिले.
सिने केसरी बाबूराव पेंटर
भारतीय चित्रपट इतिहासात बाबूराव कृष्णराव मेस्त्री अर्थात बाबूराव पेंटर यांचे नाव नेहमीच सन्मानानं घेतलं जाईल. चित्रपटांमध्ये शिल्प,कला, व्यवसाय आणि आदर्श यांचा अनोखा समन्वय करणारे ते पहिले भारतीय फिल्मकार होते. कोल्हापूर मध्ये 3 जून 1890 रोजी एका मूर्तिकार पित्याच्या घरी बाबूराव यांचा जन्म झाला. वडिलांच्या छत्र छायेखाली मूर्तिकलेचे धडे गिरवता गिरवता बाबूराव आणि त्यांचा चुलत भाऊ अनंतराव यांचे बालपण सरले. नंतर या दोघा भावांनी नाटकांचे पडदे अशा काही कुशलतेने रंगवायला सुरुवात केली की त्यामुळे नाटकांपेक्षा अधिक त्यांची चर्चा होऊ लागली.
Wednesday, May 13, 2020
दादासाहेब तोरणे आणि श्रीनाथ पाटणकर : भाग्यहीन चित्रपट निर्माते
(ए.पी.करंदीकर,व्ही.पी.दिवेकर आणि एस.एन.पाटणकर ) |
ललिता पवार यांना मिळाला अनोखा पुरस्कार; तत्कालीन मुंबई प्रांताचे पंतप्रधान बाळासाहेब खेर यांच्या हस्ते दिला गेला पुरस्कार
जेव्हा जेव्हा सामाजिक चित्रपटांमध्ये भांडण करणार्या सासू-सासऱ्याच्या भूमिकांचा विचार केला जातो तेव्हा ललिता पवार यांचे नाव पहिल्यांदा लक्षात येते. हिंदी चित्रपटात चांगल्या-वाईटावर विजय मिळवण्याच्या कथा चांगल्याच पसंत केल्या जातात. जेव्हा जेव्हा ललिता पवार यांनी विशाल हृदयाच्या महिलांच्या भूमिका निभावल्या, तेव्हा त्या चांगल्याच पसंद केल्या गेल्या. त्याचे उदाहरणच झाले तर 'अनारी' (1959) आणि 'आनंद' (1970 ) सारख्या चित्रपटांचे देता येईल. दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी श्रीमती डीसा नावाच्या एक सभ्य स्त्रीची भूमिका साकारली आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
'तारक मेहता का उलटा चष्मा'ची 'माधवी भाभी'! खूप ग्लॅमरस आहे, जाणून घ्या ती प्रत्येक एपिसोडमधून किती पैसे कमावते...
' तारक मेहता का उलटा चश्मा' या लोकप्रिय मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचे 'एकमेव सेक्रेटरी' आणि शिकवणी शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांच्या पत्नी -माधवीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशी गेल्या 11 वर्षांपासून या मालिकेशी संबंधित आहेत. या मालिकेत आपल्या साधेपणाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री ही रियल आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. रील लाइफमध्ये पापड आणि लोणची बनवण्याची आवड असणारी सोनालिका तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर घेतलेली अनेक सुंदर आणि बोल्ड छायाचित्रे नेहमी शेअर करत राहते. चला जाणून घेऊया या 43 वर्षीय अभिनेत्रीविषयी थोडेसे...
कॅमेरामन, दिग्दर्शक बिमल रॉय
बिमल रॉय यांनी खूप सुंदर चित्रपट भारतीय प्रेक्षकांना दिले. जीवनाच्या वास्तवतेला कलात्मकता आणि काव्यात्मकतेचं सौंदर्य लक्ष्यी परिणाम देऊन रुपेरी पडद्यावर एखाद्या उत्कट कवितेसारखं चितारणाऱ्या , भारतीय जीवनशैलीचं हृद्य दर्शन घडवणाऱ्या , साहित्यकृती, अमर व्यक्तिरेखा यांचं प्रतिबिंब ज्यात आहे अशा श्रेष्ठ चित्रपटांची देणगी भारतीय रसिकांना देणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन बिमल रॉय यांचा जन्म 12 जुलै 1909 रोजी पूर्व बंगालमधील ढाक्क्याजवळच्या सौपूर या गावचे जमीनदार हेमचंद्र रॉय यांच्या संयुक्त विशाल अशा कुटुंबात झाला. अत्यंत संवेदनशील, पण बुद्धिमान असलेला हा मुलगा निसर्गाचा वेडा होता.
कोरोना काळात मराठी चित्रपटसृष्टीला सकारात्मक दिलासा
प्लॅनेट मराठीची सहा नव्या सिनेमांच्या निर्मितीची घोषणा
प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा आणि नाट्यगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ‘एबी आणि सीडी’ बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांच बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित कोलमडल. पण, त्यामुळे डगमगून न जाता निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि संपूर्ण टीमने हा चित्रपट ‘अॅमेझाॅन प्राइम’वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि लोकांनी हा सिनेमा उचलून धरला.
प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा आणि नाट्यगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ‘एबी आणि सीडी’ बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांच बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित कोलमडल. पण, त्यामुळे डगमगून न जाता निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि संपूर्ण टीमने हा चित्रपट ‘अॅमेझाॅन प्राइम’वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि लोकांनी हा सिनेमा उचलून धरला.
शर्मिला टागोर: बहुआयामी आदाकारा
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती. त्यांच्या योग्यतेनुसार सत्यजीत राय यांनी नंतर त्यांना 'देवी', 'नायक', 'अरण्येर दिन रात्रि' आणि 'सीमाबद्ध' चित्रपटांमध्ये घेतलं. करिअरच्या सुरवातीला शर्मिला यांना बंगाली चित्रपटांमध्ये संधी मिळाली. फिल्मकार तपन सिन्हा, अजय कार, आणि पार्थ चौधरी यांनी त्यांच्या चित्रपटात घेऊन त्यांच्या 'टॅलेंट' वापर करून घेतला, कारण सत्यजीत राय यांच्या दिग्दर्शिय स्पर्शाने त्या 'परीस' बनल्या होत्या.
Tuesday, May 12, 2020
द्व्यर्थी गाण्याला सुरुवात झाली 1947 साली
पी. एल. संतोषी |
लताचा आवाज गंभीर गाण्यांसाठी सी. रामचंद्रांनी वापरला तो 1949 च्या सिपाहिया चित्रपटाद्वारा. या चित्रपटात लता-चितळकर यांनी एक गीत गायले होते. 'ऐ आँख तुम न रोना, रोना तो उम्र भर है...' हे गीत ऐकतानाच सी. रामचंद्र यांच्या संगीतातील फेरफार जाणवतात. सी. रामचंद्र (चितळकर) यांचा आवाज अशा गाण्यांसाठी अनुरूप नव्हता, तरीही लतासह त्यांनी गंभीरपणे पार्श्वगायन केले. पुढे त्यांच्या संगीतात हे गांभीर्य बऱ्याचदा दिसले. 'सिपाहिया' मध्ये लताने गायलेले 'हँसी हँसी न रही और खुशी खुशी न रही' तसेच दर्द जागा के ठेस लगा के चल गये वो' या दोन गाण्यात हे गांभीर्य जाणवल्यावाचून राहात नाही.
नट्या 'आयटम सॉंग' साठी इतके पैसे घेतात
बॉलिवूडच्या चित्रपटात आयटम नंबर नसेल तर चित्रपट आपल्यापैकी अनेकांना बेरंग वाटतो. ठेका धरायला लावणार्या गाण्यांचे शौकिन आपल्यामध्ये अनेकजण असतात. त्याचबरोबर चित्रपटांची प्रसिद्धी देखील या आयटम नंबरमुळेच होते त्यामुळे प्रत्येक निर्मात्याला आपल्या चित्रपटात एक तरी आयटम नंबर ठेवावाच लागतो. त्यांचा असा विश्वास असतो, की आपला चित्रपट या आयटम नंबरमुळे हिट होऊ शकतो. पण तुम्हाला माहित आहे का या आयटम नंबरवर थिरकणार्या अभिनेत्री यासाठी किती मानधन घेतात. तर आम्ही आज तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत.
Monday, May 11, 2020
अभिनेत्री प्राजक्ता वाडिये
'रात्रीस खेळ चाले' या झी वाहिनीवरील दुसऱ्या पर्वातील मालिकेत सरिताची भूमिका प्राजक्ता वाडिये हिने केली. ही मालिका आणि तिची भूमिका खूप गाजली. या प्राजक्ताचा जन्म कणकवलीतील तराळे गावातला. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. लहानपणापासून तिला अभ्यासापेक्षा नृत्यात अधिक रस होता. आईवडिलांनीही तिला तिच्या आवडीसाठी प्रोत्साहनच दिले. शाळांमध्ये स्नेहसंमेलनात तिचा भाग हमखास असायचा आणि बक्षीसही!
हिट गाण्यांचा पतंगा (1949)
तसे पाहिले तर लता मंगेशकर हुसनलाल भगतराम यांच्याआधी सी.रामचंद्र यांच्याबरोबर गात होत्या. परंतु रामचंद्र यांच्याबरोबर लताला लोकप्रियता मिळाली ती 1949 साली प्रदर्शित झालेल्या 'पतंगा' चित्रपटाद्वारा! लोकप्रियतेच्या दृष्टीने सी.रामचंद्र यांच्यापेक्षा हुसनलाल भगतराम यांना अधिक गुण द्यावे लागतील. सुरैया सारख्या अभिनेत्री गायिकेसमोर लता टिकून राहिली तसेच शमशाद बेगम, अमिरबाई कर्नाटकी आणि ललिता देऊळकर यांच्यासारख्या पल्लेदार गायिकांसमोरही लताने आपले आगळे स्थान जमवले.
गायक उदित नारायण
उदित नारायण झा यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी बिहार येथील सहरसामध्ये एका नेपाळी शेतकरी कुटुंबात झाला. बारावीपर्यंत शिक्षण झाले. नंतर संगीत शिक्षण मुंबईच्या भारतीय विद्याभवन मधून घेतले. मैथिली, हिंदी, भोजपुरी, बंगाली आणि इंग्रजी या भाषा बोलता येतात तर जवळपास12 ते 14 भाषाअंमध्ये गाणी गायली आहेत. राजेश खन्नाच्या 'उंनिस बीस' चित्रपटात (1979) प्रथमच हिंदीत गायन केले. 'मिल गया मिला गया' हे गाणे महमंद रफी आणि उषा मंगेशकर यांच्यासोबत गायला मिळाले. 1978 मध्ये नेपाळी चित्रपट 'सिंदूर'साठी पार्श्वगायन केले.
Sunday, May 10, 2020
रविना टंडन आगामी चित्रपटात दिसणार संजय दत्तसोबत!
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या आयुष्यातील खासगी गोष्टी नेहमी शेअर करत असते. पण सोशल मीडियावर किंवा इतर कार्यक्रमांमध्ये रवीना आपल्या पतीसोबत फारच कमी वेळा दिसते. रवीनचा लग्नापर्यंतचा प्रवास तसंच तिच्या पतीबद्दल आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत.
'आंधी' चित्रपटाला झाली 45 वर्षे
खरोखर! भारतीय चित्रपटसृष्टीत 'आंधी' चित्रपटाला एक अनोखा इतिहास आहे. या चित्रपटातील उत्तम अभिनयाबद्दल संजीव कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. गुलजार यांचा 'आंधी'' हा चित्रपट रिलीज होऊन 45 वर्षे झाली आहेत. भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा चित्रपट खरोखरीच 'वादळी' ठरला. 'आंधी' हा चित्रपट 13 फेब्रुवारी 1975 रोजी भारतात प्रदर्शित झाला. परंतु तो आणीबाणीचा काळ होता, त्यामुळे काही महिन्यांतच या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. असं म्हणतात की या चित्रपटाची कथा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पती यांच्या नात्यावर आधारित होता. हेच या चित्रपटाच्या बंदीचे कारण होते. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर सत्ताधारी जनता पक्षाने या चित्रपटाला पुन्हा मान्यता दिली आणि शिवाय सरकारी दूरदर्शनवरसुद्धा प्रसारित केले.
नानाभाई भट्ट, महेश भट्ट आणि आलिया भट्ट...
पृथ्वीराज कपूर यांचे कुटुंब मोठे होते. त्यांच्या मुलांनी म्हणजे राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनी स्वत: च्या वेगळ्या फिल्म कंपन्या बनवल्या. चेतन आनंदची फिल्म कंपनी असूनही देव आनंदने स्वत: चे बॅनर तयार केले. यश चोप्रा हे बीआर चोप्रा यांचे बंधू. यश याने बीआर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले, पण आपली स्वतःची कंपनी सुरू केली. परंतु चित्रपट निर्माता-दिग्दर्शक नानाभाई भट्ट यांच्या महेश भट्ट आणि मुकेश भट्ट या दोघांनीही स्पेशल फिल्म्स हीच कंपनी स्थापन केली आणि ती पुढे चालवली. या बॅनरखाली अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. आजही खास ,वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवले जातात आहेत. विशेष म्हणजे महेश आणि मुकेश हे दुसऱ्या पत्नीची मुले, पण त्यांनी नानाभाई यांची कंपनी यशस्वीपणे चालवली. नानाभाई भट्ट यांना त्यांच्या हयातीत दोन्ही कुटुंबांना एकत्र आणता आले नाही, मात्र हे काम त्यांच्या नंतरच्या पिढीने केले.
सत्यजित रे
सत्यजित रे बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. ते एक चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, गीतकार, संगीतकार, ग्राफिक डिझायनर आणि साहित्यिक होते. ते उत्तम चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानला जात.त्यांना या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेच,पण भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरव केला.
Saturday, May 9, 2020
नूरजहाँ आणि तलत एकत्र गायलेच नाहीत
हा एक योगायोग आहे कि मलिका-ए-तरन्नुम नूरजहां आणि रेशमी,तरल आवाजाचे गायक तलत महमूद या दोघांनी एकत्र कधी कुठल्या चित्रपटात गायलं नाही. दोघांना एकत्र गायनाची संधी मिळाली पण, तरीही ते एकत्र येऊ शकले नाहीत. शेवटी हा नशिबाचा भाग म्हटला पाहिजे. मात्र संगीताचे चाहते या दोन गायकांना एकत्र गाताना पाहू शकले नाहीत आणि ऐकूही शकले नाहीत.
Friday, May 8, 2020
अभिनेत्री मयुरी देशमुख
मयुरी देशमुख मराठी अभिनेत्री. तिने थिएटरपासून सुरुवात केली आणि चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये येऊन स्थिरावली. काहीतरी वेगळं करण्याचा तिने चंगच बांधला होता. मुंबईत जन्मलेल्या मयुरीचे शिक्षण महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये झाले. पुन्हा मुंबईत येऊन तिने डेंस्टीस्टचे शिक्षण घेतले. मात्र तिला राहून राहून वाटत होतं की हा आपला प्रांत नव्हे. या क्षेत्रात आपले मन रमणार नाही. शेवटी तिने अभिनयाला आपले करिअर निवडले. अभिनयाचे धडे गिरवता गिरवता ती नाटकात काम करू लागली. यातूनच मग ती पुढे पुढे जात राहिली. ती सध्या आपल्या कामावर खूश आहे. या क्षेत्रात तिला रोज काही ना काही नवं करायला मिळतं आहे.
Wednesday, May 6, 2020
पंजाबी ढंगाचे संगीत आणणारे गुलाम हैदर
हिंदी सिनेसृष्टीत एकेकाळी बंगाली संगीतकारांचाच बोलबाला होता. मात्र त्यांना यशस्वी टक्कर देण्याचं काम आर.सी. बोराल(लाहोर),पंकज मलिक (मुंबई) आणि तिमिर बरन या 'न्यू थिएटर्स' च्या तिघांनी केलं. चालीसच दशक सुरू झाल्यानंतर पंजाबी विशेषतः मुस्लीम ढंगाचं संगीत देणाऱ्या संगीतकारांनी आपली चुणूक दाखवली आणि अवघ्या चार-पाच वर्षात च त्यांच्या 'फडकत्या' संगीतापुढं बंगाली संगीताची जादू चालायची बंद झाली.
नरगिसने दागिने विकून केली राजकपूरला मदत
राज कपूर आणि नर्गिस यांनी एकत्र 16 चित्रपटांत काम केले. त्या काळातल्या या चित्रपटांच्या चर्चेपेक्षा या दोघांचं 'अफेअर' प्रकरण खूपच चर्चेत होतं. राज कपूर आणि नर्गिसच्या पहिल्या भेटीची कहाणीही खूप रंजक आहे. त्या काळात राज कपूर आपल्या चित्रपटासाठी स्टुडिओ शोधत होता. त्याला माहिती मिळाली की नर्गिसची आई जद्दनबाई फेमस स्टुडिओमध्ये शूटिंग करत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...